अभिनेत्री नुसरत जहाँचा एक्स पती निखिल जैन आहे बायसेक्शुअल? त्यानेच सांगितले खरे काय ते


अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार नुसरत जहाँ अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी निखिल जैनसोबतच्या मतभेदाच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर नुसरत, यश दासगुप्ता आणि मुलामुळे चर्चेत राहिली. निखिलपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतने त्याच्यावर बायसेक्शुअल  (उभयलिंगी) असल्याचा आरोपही केला होता. आता या आरोपावर निखिल जैनने मौन सोडत सत्य सांगितले आहे.

बायसेक्शुअल असल्याच्या आरोपावर दिले उत्तर
एका मुलाखतीदरम्यान निखिलने सांगितले की, तो अजूनही नुसरतवर खूप प्रेम करतो. बायसेक्शुअल असल्याच्या आरोपाबाबत तो म्हणाला की, “जर मी बायसेक्शुअल असतो, तर ती माझ्यावर इतकं प्रेम कसं करू शकत होती? माझे आजही नुसरतवर खूप प्रेम आहे.” निखिल म्हणाला की, “नुसरतपूर्वी मी अनेक टॉलिवूड कलाकारांना ओळखतो. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नाती तुटली आणि घटस्फोट झाला. मात्र, आजपर्यंत कोणीही एकमेकांवर असे आरोप केलेले नाहीत.” लग्न तुटण्यामागच्या कारणाविषयी बोलताना निखिल म्हणाला की, “काहीतरी चुकीचे झाले होते, पण ते इतके पुढे जाईल हे मला माहिती नव्हते.”

एका वर्षातच तुटले लग्न
निखिल आणि नुसरतचे लग्न फक्त एक वर्ष टिकले होते. लग्नात मतभेद निर्माण झाले, तेव्हा नुसरत गरोदर होती आणि त्यानंतर ती निखिलपासून वेगळी राहू लागली. निखिलपासून विभक्त झाल्यानंतर नुसरतने स्पष्टपणे सांगितले की, त्यांचे लग्न कायदेशीर नाही. कारण, हे लग्न तुर्कीमध्ये झाले आहे आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत ते भारतात नोंदणीकृत नाही, त्यामुळे हा विवाह वैध नाही.

नुसरत यशसोबतच्या नात्यामुळे आहे चर्चेत
निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांनी जून २०१९ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. वेगवेगळ्या धर्माचे असल्याने नुसरत आणि निखिल यांना ‘विशेष विवाह कायदा’ या अंतर्गत लग्नाची नोंदणी करावी लागली, ती झाली नाही. निखिलने याबाबत सांगितले होते की, नुसरत जहाँला ते करायचे नव्हते, त्यामुळे तसे झाले नाही. निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुकतेच नुसरतने मुलाला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्या नात्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. काही काळापूर्वी नुसरतचे भांगेतील कुंकू भरलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते, त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!