अभिनेत्री नुसरत जहाँने केला बेबी बंपसोबतचा पहिला फोटो शेअर; ‘हे मूल नक्की कोणाचं?’, म्हणत युजर्सनी केले ट्रोल


तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आणि बंगाली चित्रपटातील अभिनेत्री नुसरत जहाँ ही आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. नुसरत आणि तिचा पती निखिल जैन यांच्यामधील भांडणं आता समोर आली आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी निखिल जैनने नुसरत जहाँचे बाहेर अफेअर असल्याचे सांगितले होते. त्याने त्याच्या परिवारामध्ये चाललेले वाद देखील सर्वांसमोर मांडले होते. निखिल आणि नुसरत अनेक दिवसांपासून वेगळे राहत आहेत. यामध्येच नुसरतने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंपसोबत पोझ देताना दिसत आहे. (Nusrat jahan share her first baby bump photo on social media)

नुसरत जहाँ ही पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “दयाळूपणा सगळं काही बदलते.” तिने हा फोटो शेअर करताच युजरने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तिला नेटकरी खूपच प्रश्न विचारत आहेत. एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करून लिहिले आहे की, “धोका देऊन तुला काय मिळालं.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “हे मूल नक्की कोणाचं आहे?” आणखी एका युजरने लिहिले आहे की, “तुझ्याकडे काही दया आहे का?”

मागील काही दिवसांपासून ती तिच्या पतीपासून लांब राहत आहे. त्या दोघांमधील अंतर सर्वांसमोर आहे. नुसरत गरोदर असल्याची बातमी जेव्हा व्हायरल झाली., तेव्हा निखिलने ते मूल त्याचे नसल्याचे सांगितले. त्याने तिच्या अफेअरबाबत देखील माहिती दिली. तिचे अभिनेता यश दासगुप्ता याच्यासोबत अफेअर असल्याची माहिती समोर आली आहे. ती यश‌ दासगुप्ता याच्यासोबत सुट्ट्यांवर जाण्याचेदेखील वृत्त आले होते.

परंतु अजूनही नुसरत जहाँने आणि यश दासगुप्ता याने या गोष्टीची कोणतीच माहिती दिली नाही. नुसरत आणि निखिलचे नाते बिघडण्यासाठी देखील यश जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. या बाबत बांगलादेशमधील लेखिका तसलिमा नसरीन यांनी पोस्ट शेअर करत नुसरत जहाँला निखिलपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.