Thursday, April 18, 2024

अपहरण अन् मारहाणीच्या आराेपावर हनी सिंगने साेडले माैन; म्हणाला, ‘माझी प्रतिमा डागाळण्यासाठी…’

रॅपर हनी सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येतो. काही दिवसांपूर्वीच गायक त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत ब्रेकअप केल्याच्या अफवेमुळेच चर्चेत आला हाेता. मात्र, हनी सिंगने त्याच्या ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशात आता एका कार्यक्रमा दरम्यान आयोजकाने लावलेल्या आरोपांमुळे हनी सिंग चर्चेत आला आहे, ज्यावर हनीने आपले माैन साेडले असून एक निवेदन जारी केले आहे.

तर झाले असे की, अलीकडेच एका इव्हेंट आयोजकाने हनी सिंग आणि त्याच्या टीमवर अपहरण आणि हल्ल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. अशात यावर नुकतेच हनी सिंगने आपली बाजू मांडणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

रॅपर हनी सिंगने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट टाकली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपले स्पष्टीकरण देत लिहिले की, ‘माझ्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार आणि केलेले आरोप निराधार आहेत. मी किंवा माझी कंपनी या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाही किंवा आमच्यात कोणताही करार नाही जो सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये दाखवला जात आहे. मुंबई शोसाठी, मी ट्रायव्हाइब नावाच्या कंपनीशी संबंधित होतो, जी बुक माय शोची कंपनी आहे. या कार्यक्रमात मला जेवढा वेळ मिळाला तेवढा मी परफॉर्म केला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

हनी सिंगने आपल्या वक्तव्यात पुढे लिहिले की, ‘याशिवाय माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत आणि हे सर्व माझी प्रतिमा खराब करण्यासाठी केले जात आहे. माझी टीम या प्रकरणी त्याच्याविरुद्ध कायदेशीर मानहानीचा दावा करण्यास तयार आहे.’

हनी सिंगने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करताच युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आम्ही नेहमीच तुझ्यावर प्रेम करतो पाजी, यो-यो आर्मीला तुमच्यावर आधीच विश्वास होता’. तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘पाजी, काळजी करू नका, यो-यो आर्मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत आहे’.(yo yo honey singh denies allegations of kidnapping and mishandling says attempt to tarnish my image )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पन्नाशी उलटलेला सलमान खान त्याच्या ‘या ड्रिमगर्ल’च्या आठवणीत आहे अविवाहित, स्वतःच केला खुलासा

सलमान खानच्या ‘मूव्ह ऑन’ कमेंटवर शहनाजने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘सलमान सर नेहमी…’

हे देखील वाचा