Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड पार्टीतला बाेल्ड लूक अन् हातात दारुचा ग्लास, अजयच्या लेकीचा सेलिब्रेशन व्हिडिओ पाहिलात का?

पार्टीतला बाेल्ड लूक अन् हातात दारुचा ग्लास, अजयच्या लेकीचा सेलिब्रेशन व्हिडिओ पाहिलात का?

अजय देवगण आणि काजोल यांची लेक न्यासा देवगण खूप चर्चेत असते. आजकाल ती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे मीडियामध्ये खुपच चर्चेत आहे. अलीकडेच न्यासा मित्रांसोबत हँग आउट करताना आणि बॉलीवूड स्टार्सच्या पार्ट्यांना हजेरी लावताना दिसली. या दरम्यान, न्यासा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दुबईला रवाना झाली आहे, जिथून तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी न्यासा (nysa devgn) सध्या दुबईमध्ये आहे, जिथून ती तिचे फोटो सोशल मीडियावर सतत पाेस्ट करत आहेत. न्यासाच्या जीवलग मित्र ओरहान अवतरमणि याने शुक्रवारी ( दि. 30 डिसेंबर)ला एका अज्ञात ठिकाणाहून अनेक फाेटाे शेअर केली. फाेटाेंमध्ये न्यासाने नॉटेड क्रॉप टॉप आणि काळा स्लिट स्कर्ट घातला होता, तर तानियाने सिल्व्हर टॉप आणि बॅगी डेनिम जीन्स परिधान केला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by nysa_devgan (@nyasa_devgan_)

यापूर्वी न्यासा देवगण एका मैदानी थँक्सगिव्हिंग पार्टीत मजा करताना दिसली होती. या पार्टीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत होती. ओरहान अवतारमणीने आयोजित केलेल्या या पार्टीत तिने आपल्या मित्रांसोबत खूप मजा केली. न्यासाच्या फॅन पेजने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती गुलाबी स्वेटर आणि शॉर्ट डेनिम स्कर्टमध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by nysa_devgan (@nyasa_devgan_)

न्यासाने युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशिया, सिंगापूर येथून ग्रॅज्युएशन केले आहे. ती सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनेशनल हॉस्पिटॅलिटी करत आहे. ती अनेकदा तिच्या मित्रांसोबत आंतरराष्ट्रीय सहलीला जाताना दिसते. (nysa devgn seen partying in dubai with best friend orhan dance video viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विजय सेतुपतीपासून ते नयनतारापर्यंत हे साऊथ स्टार्स 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
चुकूनही कुटुंबासाेबत पाहू नका ‘या’ 5 वेब सीरीज, नुसता अश्लील संवाद आणि बाेल्ड सीन्सचा आहे भडीमार

हे देखील वाचा