Sunday, April 14, 2024

विजय सेतुपतीपासून ते नयनतारापर्यंत हे साऊथ स्टार्स 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण

2022 हे वर्ष संपूर्णपणे साऊथ चित्रपटांच्या नावावर होते. येथील अनेक चित्रपटांनी कमाईचे नवे विक्रम केले. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये ‘दृश्यम’ आणि ‘ब्रह्मास्त्र’हेच चांगली कमाई करू शकले. अशा परिस्थितीत बॉलीवूडची प्रतिष्ठा घसरल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. अशात साऊथचे काही मोठे सुपरस्टार पुढील वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हे बडे स्टार्स हिंदी सिनेसृष्टीत किती चांगली कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चला, तर मग त्या साऊथ स्टार्सबद्दल जाणून घेऊया जे 2023 मध्ये बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्यांनी गेल्या काही दिवसात हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधीच्या तुलनेत या स्टार्सची चर्चा वाढली असून प्रेक्षक त्यांना ओळखू लागले आहेत. यामुळेच 2023 मध्ये काही चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून या बड्या स्टार्सना घेऊन येत आहेत.

नयनतारा
शाहरुख हा बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. तो 2023 मध्ये तीन मोठ्या चित्रपटांतून पुनरागमन करत आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘पठाण’ वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. यानंतर वर्षाच्या मध्यात ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात साऊथची हिट अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल. मोठ्या बजेटमध्ये बनत असलेल्या या चित्रपटात नयनताराची व्यक्तिरेखा खूप खास आहे.

विजय सेतुपति
विजय सेतुपती हे साऊथ सिनेसृष्टीतील एक मोठे नाव आहे. अशातच तो पुढच्या वर्षी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या सोबत या चित्रपटात कॅटरिना कॅफ दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातही त्याची उपस्थिती असल्याची चर्चा आहे.

अमाला पॉल
साऊथ अभिनेत्री अमला पॉल 2023मध्ये अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिने या चित्रपटाचे काही भाग शूटही केले आहेत. हा सिनेमा साऊथच्या हिट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे.

पृथ्वीराज सुकुमारन
अली अब्बास जफर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, आणखी एका मोठ्या कलाकाराचा चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाद्वारे मल्याळम अभिनेता-दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात तो ‘कबीर’ची भूमिका साकारणार असून  नकारात्मक राेलमध्ये दिसणार आहे.

समंथा रुथ प्रभू
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, समंथाने आयुष्मान खुरानासोबतच्या चित्रपटासाठी होकार दिला आहे. हा चित्रपट 2023 च्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. (bollywood actress nayanthara vijay sethupathi amala paul prithviraj sukumaran samantha ruth prabhu debuting in bollywood )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पंचायत 2’ ते ‘दिल्ली क्राईम 2’, 2022मध्ये गाजलेल्या 5 वेबसीरिज, एक नजर टाकाच

चुकूनही कुटुंबासाेबत पाहू नका ‘या’ 5 वेब सीरीज, नुसता अश्लील संवाद आणि बाेल्ड सीन्सचा आहे भडीमार

हे देखील वाचा