Tuesday, June 24, 2025
Home कॅलेंडर हजारो चित्रपट भारतात बनले पण इतिहासात पहिल्यांदाच असं होणार, तेही फक्त रजनीसाठी

हजारो चित्रपट भारतात बनले पण इतिहासात पहिल्यांदाच असं होणार, तेही फक्त रजनीसाठी

रजनीकांत भारतीय सृष्टीचे सुपरहिरो म्हणून ओळखले जातात. रजनीकांत यांच्यासाठी आणि त्यांच्याकरिता काहीच अशक्य नाहीये. रजनीकांत याना सर्व काही शक्य असते. नुकतेच रजनीकांत रुग्णालयातून घरी परतले आहे. रजनीकांत यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. रजनीकांत हैद्राबादमध्ये ‘अन्नाथे’ चित्रपटाची शूटिंग करत असताना त्यांना रक्तदाबादचा त्रास सुरु झाल्याने चेन्नईमध्ये ऍडमिट केले होते. आता रजनीकांत याना दोन महिने बेडरेस्ट सांगितलं आहे.

आता रजनीकांत याना दोन महिने बेडरेस्ट दिल्याने त्यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबेल. त्यामुळे ‘अन्नाथे’ चित्रपटांच्या निर्माता, दिग्दर्शकांनी ह्या चित्रपटाचा संपूर्ण सेट हैद्राबादवरुन चेन्नईला हलवला आहे. त्यामुळे आता रजनीकांत देखील वर्क फ्रॉम होम करणार आहे.

रजनीकांत यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ते राजकारणात येऊन नवीन पक्षाची स्थापना करत येत्या निवडणूक देखील लढवणर असल्याचे सांगितले होते. मात्र नुकतेच त्यांनी राजकारणातून माघार घेतली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी राजकारणात न येण्याचे ठरवले आहे. मात्र आता रजनीकांत यांना ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अडकलेल्या पैशाबद्दल चिंता वाटत असल्याने त्यांनी ‘अन्नाथे’ च्या संपूर्ण टीमला ह्या चित्रपटाचा सेट चेन्नईला हलवण्याची विनंती केली. त्याची ही विनंती मान्य देखील झाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत असे पहिल्यांदा घडणार आहे की, चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्यासठी चित्रपटाचा संपूर्ण सेट एका शहरातू दुसऱ्या शहरात हलवण्यात येणार आहे.

‘अन्नाथे’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सिनेमाच्या क्रू मेंबर्सला कोरोना झाल्याने शूटिंग मधेच थांबवण्यात आले. त्यामुळे रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी केली पण सुदैवाने त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली. तिथेच त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते. आता त्यांची प्रकृती ठीक असून ते घरी आहे. या चित्रपटाचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून हा सेट आता चेन्नईमध्ये लावला जाणार आहे.

रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात खुशबू, नयनतारा, कीर्ति सुरेश, प्रकाश राज यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे देखील वाचा