Thursday, June 13, 2024

‘OMG 2’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अक्षयच्या ‘शिवदूत’ अवतारावर चाहते फिदा; Video

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हापासूनच प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अशात गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यापूर्वी अक्षयचा ‘ओएमजी- ओह माय गॉड) चित्रपट प्रदर्शित झाला होता. अशात ‘ओएमजी 2’ हा सीक्वेल आहे.

‘ओएमजी 2’ चित्रपटाचा ट्रेलर (OMG 2 Trailer) प्रदर्शित करण्यापूर्वी वादात सापडला होता. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘ओएमजी 2’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात आला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्रासह सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे. सेन्सॉर बोर्डाने 27 बदल करत हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आहे.

या ट्रेलरची सुरुवात “नंदी मेरे भक्त पर विपदा आने वाली है मेरे शिवगण में से किसी ऐसे को ले जाओ जो उसकी रक्षा कर सके,” असा डायलॉग ऐकू येतो. त्यानंतर ट्रेलरमध्ये कोर्टरूम सीन दिसतो. ज्यामध्ये दिसते की, कोर्टात कांती शरण मुद्गल यांचे नाव घेतले जाते. आरोपी आणि तक्रारदार कोण? असा सवाल न्यायाधीश विचारतात. त्यानंतर दोन्ही प्रश्नांची उत्तरं देताना पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हात वर उचलतात. या चित्रपटात त्याचा मुलगा आत्महत्या करताना दाखवले आहे. शाळेत त्याला सतत त्रास दिला जात असतो. हेच त्या मुलाला सहन होत नाही आणि तो रेल्वे रुळावर उभा राहतो. यानंतर पंकज त्रिपाठी साकारत असलेले पात्र आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावते. या चित्रपटातील पंकज त्रिपाठीच्या पात्राचे नाव कांती शरण मुद्गल आहे.

कांती शरण मुद्गल अर्थात पंकज त्रिपाठीचे हे पात्र आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी भगवान महादेवाकडे जाते. दरम्यान, अक्षय कुमारची एन्ट्री होते. ट्रेलरवरून लक्षात येते की, अक्षय यावेळी महादेवाच्या अवतारात दिसणार आहे. त्यांची वेशभूषा भगवान शंकरासारखी दाखवण्यात आली असली, तरी शिवदूताचे चार अवतार हे पात्र करणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये कुठेही त्याचा उल्लेख शिवाचा अवतार म्हणून करण्यात आलेला नाही. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. ट्रेलरमध्ये ती वकिलाच्या भूमिकेत दिसली आहे. ट्रेलर पाहून लक्षात येते की, यामी गौतम (Yami Gautam) साकारात असलेल्या या पात्राला चित्रपटात नकारात्मक भूमिका देण्यात आली आहे. ती पंकज त्रिपाठीविरुद्ध खटला लढते. अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यानं सोशल मीडियावर ‘ओएमजी 2’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, “शुरू करो स्वागत की तैयारी… 11 अगस्त को आ रहे हैं डमरूधारी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारनं शेअर केलेल्या ‘ओएमजी 2’ या चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (omg 2 trailer out akshay kumar pankaj  tripathi and yami gautam social drama)

अधिक वाचा-
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार; जाणुन घ्या सविस्तर माहिती
‘ही बार्बी नाही, म्हैस आहे….’ बॉडी शेम करणाऱ्यांवर वाहबिज दोराबजींने दिलं सडेतोड उत्तर

हे देखील वाचा