Monday, September 25, 2023

रख विश्वास तू है शिव का दास! अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ सिनेमाचा दमदार टिझर प्रदर्शित

मागील बऱ्याच दिवसांपासून सतत चर्चेत येणारा सिनेमा म्हणजे ‘ओह माय गॉड 2’. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची कमालीची क्रेझ लोकांमध्ये आहे. सिनेमाचा पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर आता या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याबद्दल सर्वानाच खूप उत्सुकता आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रावणात सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून, अक्षय कुमारच्या शिवच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमात अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे.

ओह माय गॉड २ या सिनेमात देखील आस्तिक आणि नास्तिक यामध्ये असणारा मतभेद पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये अक्षय आणि पंकज त्रिपाठी त्यांचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात परेश रावल हे नास्तिक असणाऱ्या कांजीलाल मेहता यांच्या भूमिकेत दिसले होते. मात्र, दुसऱ्या भागात पंकज त्रिपाठी हे अतिशय आस्तिक अशा कांतीशरण मुतकल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची कथा याच अवतीभोवती फिरेल.

ओह माय गॉड २ सिनेमात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत दिसेल. केसांच्या लांब जटा, कपाळाला भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा लूकमध्ये तो चांगलाच चर्चेत आला आहे. OMG सिनेमात संधूच्या भूमिकेत दिसणारे जेष्ठ अभिनेते गोविंद नामदेव या भागात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ओ माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अक्षय कुमार पंकज त्रिपाठी यांच्यासोबत यामी गौतम देखील दिसणार आहे. मुख्य बाब म्हणजे ओह माय गॉड २ सिनेमात भगवान प्रभू श्रीरामाची भूमिका अभिनेते अरुण गोविल साकारणार आहेत.

अधिक वाचा-
प्राण यांच्यासोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आलेली वेळ, बरं-वाईट होण्याच्या भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री
गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

हे देखील वाचा