Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरे वा! ‘या’ अभिनेत्रीने चक्क साडी नेसून मारल्या कार्टव्हील उड्या, खोटे वाटते आहे ना मग बघा हा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री ह्या त्यांच्या अभिनयासोबतच फिटनेस साठी देखील तितक्याच प्रसिद्ध आहे. ह्या अभिनेत्री नेहमीच त्यांचे व्यायाम, योगा करतानाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यात अभिनेत्री अदा शर्मा देखील मागे नाही. अदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरून पोस्ट करते. यात तिचे योगा आणि व्यायामाचे देखील व्हिडिओ असतात. नुकताच अदाने  एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो सध्या खूप वायरल होत आहे.

अदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा कार्टव्हील उडी मारत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिने चक्क साडी नेसून कार्टव्हील उडी मारली आहे. गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या अदाने एक नव्हे चक्क चार कार्टव्हील उड्या मारल्या आहेत. साडीमध्ये अशी उडी मारणे खूप कठीण आहे. मात्र, अदाने अगदी लीलया या उड्या मारल्या. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. समुद्र किनाऱ्यावर मारलेल्या अदाच्या या कार्टव्हील उड्यांचा व्हिडिओ खूप वायरल होत आहे.

दरम्यान अदा ही खासकरुन साऊथ चित्रपटांमध्ये काम करते. २००८ साली आलेल्या विक्रम भट्ट यांच्या ‘१९२०’ या चित्रपटातून अदाने सिनेसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटासाठी अदाला फिल्मफेयरचे उत्कृष्ट पदार्पण विभागात नामांकनही मिळाले होते. हा चित्रपट मात्र  फ्लॉप ठरला होता. त्यानंतर तिने ‘हम हैं राही यार के’ हा रोमँटिक चित्रपट देखील केला. हा सिनेमादेखील आपटला. त्यानंतर अदा परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘हंसी तोच फसी’ मध्ये देखील दिसली. अदा विद्युत जमवालच्या कमांडो 3 या सिनेमात शेवटी दिसली होती. हिंदीमध्ये मनासारखे यश न मिळाल्याने अदाने पुन्हा तिचा मोर्चा तामिळ आणि कन्नड सिनेमांकडे वळवला.

हे देखील वाचा