चला हवा येऊ द्या या शोमधून मोठ्या प्रमाणावर नावलौकिक मिळवलेला हास्य कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने एक विनोदी अभिनेता म्हणून मोठी ओळख जरी मिळवली असली तरी त्याने विविध प्रकारच्या अनेक भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारल्या. आज तो एक विनोदवीरासोबतच प्रभावी अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. कुशल त्याच्या विविध भूमिकांसाठी तर गाजतोच सोबतच तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी देखील चर्चेत येतो.
कुशल नेहमीच ‘सुकून’च्या पोस्ट लिहीत त्याच्या फॅन्ससोबत त्या शेअर करताना दिसतो. या पोस्टमधून एका वेगळ्याच कुशलचे दर्शन त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना होत असते. आता देखील तो त्याच्या एक पोस्टमुळे खूपच चर्चेत आला आहे. त्याने त्याचा एक फोटो शेअर केला असून, त्यासोबत एक पोस्ट लिहिली आहे. जी सध्या सगळीकडे चांगलीच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “म्हातारीच्या कापसाची गोष्ट.
लहानपणी, अलगद ओंजळीत झेललेल्या ”म्हातारीच्या कापसाला” मी हळूच फुंकर घालायचो की तो कापूस हवे सोबत उडत… उडत… जायचा मग पुन्हा अलगद त्याला ओंजळीत झेलायचं,पुन्हा फुंकर, पुन्हा हवा, तोच खेळ पुन्हा पुन्हा. मग कधीतरी जोराचा वारा यायचा आणि कुणास ठाऊक कुठे ? पण “म्हातारीचा कापूस” घेऊन लांब… उडून जायचा आणि मी… मी त्या उडत जाणाऱ्या “म्हातारीच्या कापसाकडे” नुसतं बघत रहायचो, असहायपणे तो दिसेनासा होईपर्यंत.
आणि मनात मात्र खूप दुःख-दुःख व्हायचं.
त्यावेळी त्या “म्हातारीच्या कापसाने” मनाला झालेली जखम आजपर्यंत कोणत्याच कापसाने टिपता आली नाही मला.
हल्ली, काही नाती सुद्धा त्या “म्हातारीच्या कापसासारखी” अलगद ओंजळीतून निसटून जात आहेत आणि मला मात्र पुन्हा लहान झाल्यासारखं झालंय, “उडून जाणाऱ्या म्हातारी कडे नुसतं बघत बसणारं एक लहान मुल”.
कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या विचारांचे कौतुक केले आहे. मात्र यात अभिनेता संतोष जुवेकरने केलेली कमेंट चांगलीच गाजत आहे. संतोषने त्याच्या कमेंटमध्ये लिहिले, “तू आता फक्त २ बोटं उरलायस शाहरुख व्हायला होशील लवकरच होशील. फक्त आता केस सतत डोळ्यावर येण्याची acting करत रहा”. दरम्यान कुशल सध्या चला हवा येऊ द्यासोबतच विविध चित्रपटांमध्ये देखील काम करताना दिसत आहे.
अधिक वाचा-
–शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
–‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल