Tuesday, September 26, 2023

‘या’ निर्मात्याने निकी तांबोळीला दिलेला त्रास, वाढदिवशी वाचा अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही रहस्य

‘बिग बॉस हा असा एक शो आहे. ज्यामधून लोकांना फेम, नेम सगळं काही मिळत. अनेकांना तर या प्लॅटफॉर्मवरूनच त्यांची खरी ओळख मिळाली. यातील एक लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेत्री निकी तांबोळी. बिग बॉसच्या घरातून नावारूपाला आलेली निकी आज अनेकांची फेव्हरेट बनली आहे. तिच्या बोल्डनेसमध्ये ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. 21 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही मजेशीर माहिती…

निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) अगदी लहान वयात मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. माध्यमातील वृत्तानुसार वयाच्या 21 व्या वर्षी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. याशिवाय तिने चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. निक्कीने आतापर्यंत अनेक तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिक्की गाडीलो चिटकोटूडू’ या चित्रपटाद्वारे त्याने पदार्पण केले. याशिवाय ती ‘टिपारा मीसम’ आणि ‘कांचना 3’ सारख्या चित्रपटातही दिसली आहे. मनोबाला, श्रीमन आणि राजेंद्रन सुरी या अभिनेत्यांसोबत तिने काम केले.

निक्की तांबोळी प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 14 चा देखील भाग होती, या शोमध्ये ती आपल्या शानदार खेळाने शेवटपर्यंत टिकून राहिली. या शोमध्ये तिला विजेती ट्रॉफी जरी मिळवता आली नसली, तरी ती सेकंड रनरअप होण्यात नक्कीच यशस्वी ठरली. निकीचे नाव प्रतीक सहजपालसोबतही जोडले गेले आहे. बिग बॉस 15 च्या दरम्यान, जेव्हा निक्की अतिथी म्हणून गेस्ट हाऊसमध्ये गेली तेव्हा तिने सांगितले की तिला प्रतीक खूप आवडतो आणि ती बाहेर त्याची वाट पाहत असते. यानंतर दोघे कलर्सच्या ‘खतरा खतरा’ शोमध्येही दिसले होते.

नुकतेच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत निकीने तिच्या आयुष्याशी संबंधित एक मोठे रहस्य उघड केले. तिने सांगितले की, संघर्षाच्या दिवसांमध्ये दक्षिणेतील एका चित्रपट निर्मात्याकडून तिला खूप त्रास दिला गेला. निक्की म्हणण्यानुसार, त्या दिग्दर्शकाचा दृष्टिकोन योग्य नव्हता, तो सेटवर इतर लोकांसोबत असेच वागायचा. निक्कीने या मुलाखतीत दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केला नाही. (On the occasion of actress Nikki Tamboli birthday, read the interesting facts from her life)

अधिक वाचा- 
बिग बॉसची स्पर्धक आणि नकारात्मक भूमिका साकारून यशस्वी झालेल्या पवित्रा पुनियाबाबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात

हे देखील वाचा