Sunday, October 1, 2023

बिग बॉसची स्पर्धक आणि नकारात्मक भूमिका साकारून यशस्वी झालेल्या पवित्रा पुनियाबाबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात एकतरी प्रेम प्रकरण पाहायला मिळतेच मिळते. बिग बॉसच्या 14व्या पर्वात देखील अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्रा पुनिया या दोघांमध्ये प्रेम फुललेले आपल्याला पाहायला मिळाले. या दोघांचे बिग बॉसच्या घरात अनेक वेळा भांडण झाले मात्र त्यांच्यात असलेले प्रेम काही कमी झाले नाही. ते म्हणतात ना, जिथे जास्त प्रेम तिथेच जास्त भांडण होतात अगदी असेच काहीसे या दोघांच्या बाबतीत झाले. बिग बॉसच्या घरात आणि मीडियामध्ये या दोघांची लव्ह स्टोरी ही सतत चर्चेत होती.

पवित्राने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मला एजाज खान आवडतो, पण माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे, ते मला माहिती नाही.” बिग बॉसच्या घरात एजाज खानला पवित्राच्या नावाने निक्की तांबोळी, जान कुमार सानू, कविता कौशिक चिडवताना दिसायचे. तेव्हापासून पवित्रा जास्त प्रकाशझोतात आली. पवित्राने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. बहुतकरून नकारात्मक भूमिकेत दिसलेल्या पवित्राची फॅन फॉलोविंग देखील तुफान आहे. (know these things about pavitra puniya)

पवित्र तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते. 2009साली ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘स्प्लिट्सविला 3’ या शोमध्ये पवित्रा पहिल्यांदा दिसली. त्यानंतर तिने ‘लव यू जिंदगी’, ‘नागिन ३’ ‘कवच’ या मालिकांमध्ये काम केले. विशेषत: तिने साकारलेल्या निगेटीव्ह भूमिका खूप लोकप्रिय झाल्या.

पवित्रा मुंबईची रहिवासी आहे. तिचा जन्म 22 ऑगस्ट 1988साली झाला. पवित्राने मेडीकल डिप्लोमा केला. त्यानंतर ती माॅडलिंगकडे वळाली. पवित्राचे खरे नाव खूप कमी चाहत्यांना माहित आहे. तिचे खरे नाव नेहा सिंग असून, पवित्राने सिध्दार्थ शुक्ला आणि पारस छाबडा यांना डेट केले आहे. आता पवित्रा आणि एजाज खान रिलेशनशिपमध्ये आहेत.

एजाज आणि तिच्या नात्यावरून बोलणाऱ्यांना, ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तरे दिली आहेत. दोघेही मुंबईत राहतात. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि घट्ट झाले आहे. चाहत्यांनाही त्यांची केमिस्ट्री खूप आवडते. दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. हे जोडपे बऱ्याचदा त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतात. एजाज आणि पवित्राने अद्यापही लग्न विषयी कोणतेही नियोजन केले नाही.

हेही नक्की वाचा-
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात
गोपी बहूच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवोलिनाने घेतलंय फॅशन डिझायनिंगचे शिक्षण, ‘अशी’ झाली करिअरला सुरुवात

हे देखील वाचा