Saturday, June 29, 2024

चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

प्रत्येक घरात मुलगी जन्माला आल्यानंतर आनंद साजरा केला जातो असे नाही. विशेषत: जेव्हा एका घरात चार मुली जन्माला येतात तेव्हा तर नाहीच. मोहन बहिणींचीही कहाणी काहीशी अशीच आहे. चार मुली झाल्यावर त्यांचे वडील क्षणभर निराश झाले होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्याच मुली आज बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत. नीती मोहनबद्दल बोलायचे झाले, तर नीतीने बॉलिवूडमधील एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. आज ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामील झाली आहे. शनिवारी (१८ नोव्हेंबर) नीती मोहनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या बहिणींबद्दलच्या मनोरंजक गोष्टी.

नीती मोहन
नीती मोहन (Neeti Mohan) ही सध्या बॉलिवूडमधील टॉप गायकांपैकी एक आहे. यासोबतच तिने अनेक रियॅलिटी शो देखील होस्ट केले आहेत. तिचा जन्म १८ नोव्हेंबर १९७९ रोजी झाला. चार बहिणींमध्ये नीती सर्वात मोठी आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने पहिल्यांदा गायनात पदार्पण केले.

शक्ती मोहन
एकेकाळी ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘डान्स दिवाने’ यांसारख्या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून डान्स करणारी शक्ती मोहन बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांना डान्स करायला लावेल, हे कोणाला माहीत होते. दोन नंबरची बहीण शक्ती आज अनेक डान्स रियॅलिटी शो होस्ट करत आहे. यासोबतच ती बॉलिवूड कलाकारांना डान्स शिकवते.

मुक्ती मोहन
तिसर्‍या क्रमांकाची बहीण मुक्तीही तिच्या मोठ्या बहिणींपेक्षा कमी नाही. तिने ‘जरा नच के दिखा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून करिअरला सुरुवात केली. आता ती तिच्या युट्यूब चॅनेलवर कोरियोग्राफी आणि डान्सशी संबंधित व्हिडिओ टाकते.

क्रिती मोहन
मोहन बहिणींमध्ये सर्वात लहान असलेल्या क्रितीचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून करिअर निवडले. विशेष म्हणजे या चारही बहिणी आपापल्या क्षेत्रात भरारी घेत असून, आज त्यांच्या पालकांना त्यांचा अभिमान वाटतो. (On the occasion of famous singer Neeti Mohan birthday know interesting facts about her sisters)

आधिक वाचा-
बर्थडे गर्ल ‘नेहा’ : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनु मलिकांवर लगावला होता यौन शोषणाचा आरोप, वाचा जीवनप्रवास
अभिनेता आयुषमान खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग

हे देखील वाचा