Saturday, January 28, 2023

अभिनेता आयुषमान खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग

आयुष्मान खुरानाचा लाडका भाऊ आणि बॉलिवूडचा टायमिंग कॉमेडी अभिनेता म्हणजे अपारशक्ती खुराना. त्याने त्याच्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचे सगळे श्रेय त्याच्या मेहनतीला जाते.

खूप कमी कालावधीत अपारशक्तीने जे काम केले आहे ते, नावाजण्याजोगे आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळाच अपारशक्ती प्रेक्षकांना दिसला आहे. त्याचा उत्साहिपणा आणि स्टाईल यामुळे तो सर्वत्र ओळखला जातो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तो डिमांडेड अभिनेता आहे.

अपारशक्ती गुरुवार (१८ नोव्हेंबर) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १८ नोव्हेंबर १९८७ मध्ये चंदिगढ येथे झाला. चला तर त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या पाच सुपरहिट भूमिका; (Apatshakti khurana celebrate his birthday : let’s know his five comedy character)

  • दंगल

अपारशक्तीने आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने ओमकार सिंग फोगट हे पात्र निभावले होते. जो आमिर खानचा भाचा होता. या चित्रपटात त्याचे कॉमेडी पात्र सगळ्यांना आवडले होते. त्याला २०१६ मध्ये या पात्रासाठी फिल्मफेअर अवॉर्डसाठी कॉमिक रोल या कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. (Aparshakti Khurana Films)

  • बद्रिनाथ की दुल्हनिया

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटात आपरशक्तीने आलिया भट्टच्या दाजीची भूमिका निभावली होती. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. चित्रपटातील त्याच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती.

स्त्री

राजकुमार राव, श्रद्धा कपूर हे कलाकार असलेले आणि अमर कौशिक यांनी दिग्दर्शन केलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपटात अपारशक्तीने त्याच्या अभिनयाने पुन्हा एकदा सगळ्यांची मने जिंकून घेतली. या चित्रपटात त्याने राजकुमार रावच्या मित्राची भूमिका निभावली होती. फिल्मफेअर अवॉर्डमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगरी नामांकन मिळाले होते.

लुक्का चुप्पी

या चित्रपटात अपारशक्तीने अब्बास शेखचे पात्र निभावले होते. या चित्रपटात तो अभिनेता कार्तिक आर्यन याचा कॅमेरामॅन बनला होता. या चित्रपटातील त्याचे पात्र देखील कॉमेडी होते. या चित्रपटात क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होती.

पती पत्नी और कौन

मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अपारशक्तीने मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता कार्तिक आर्यन याच्या मित्राची भूमिका निभावली होती. या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे देखील सर्वत्र खूप कौतुक झाले.

हेही वाचा – ‘ऐतराज’ सिनेमात अक्षयच्या अपोझिट ‘तसला’ रोल मिळाल्याने ढसाढसा रडलेली प्रियांका, निर्मात्याचा खुलासा
तेव्हा अभिनेत्रींना ‘या’ गोष्टीसाठी वापरले जायचे, ‘गंगा’चा 26 वर्षांनंतर खळबळजनक खुलासा
‘बिग बॉस 16’ प्रोमोमध्ये सलमान अचानक कसा पलटला?, समोर आलेल्या व्हिडिओने फोडलं भांडं

 

हे देखील वाचा