Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘मी संपूर्ण जगाला सांगू इच्छिते की तू…’, म्हणत अनुष्काने विराटला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘मी संपूर्ण जगाला सांगू इच्छिते की तू…’, म्हणत अनुष्काने विराटला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज (५ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा नवरा विराट कोहली त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटविश्वात नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणारा विराट आज त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत असून, त्याला संपूर्ण जगातून शुभेच्छा मिळत आहे. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये त्याला अनुष्का शर्माने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विराट कोहलीने आपल्या जबरदस्त फलंदाजीमुळे आणि यशस्वी कॅप्टनशिपमुळे संपूर्ण जगात नाव कमावले. आज त्याचे संपूर्ण जगात चाहते आहेत. सर्वच चाहते आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, अनुष्काने देखील त्याला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा आणि विराटचा एक रोमँटिक आणि सुंदर फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक खास मेसेज देखील लिहिला आहे. अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “हा फोटो आणि ज्या पद्धतीने तू तुझे जीवन जगतो त्याला कोणत्याही फिल्टरची आवश्यकता नाही. तू पूर्णतः प्रामाणिकता आणि हिंमतीपासून तयार झाला आहे. साहस जे शंकेला विस्मृतीत बदलून टाकते. मी कोणालाही नाही ओळखत जो अंधारातून स्वतःला बाहेर काढून प्रत्येक बाजूने अधिक चांगला होत जाईल कारण तू स्वतःमध्ये कोणत्याच गोष्टीला कायमस्वरूपी मनात नाही. आणि नेहमीच निडर राहतोस. मला माहित आहे की, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांबद्दल बोलणारे अजिबात नाहीये. मात्र कधी कधी मला हे बोलावेसे वाटते आणि जगाला सांगावेसे वाटते की, तू खरंच किती चांगला व्यक्ती आहेस. ते लोकं खरंच खूप नशीबवान आहेत, जे तुला ओळखतात. सर्व काही अधिक प्रकाशमान आणि सुंदर बनवण्यासाठी खूप धन्यवाद ओय, आणि हॅप्पी बर्थडे क्युटनेस!”

अनुष्काची ही पोस्ट आणि या पोस्टमध्ये तिने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट दोघेही दुबईमध्ये पारंपरिक पोशाखात दिसत असून, कदाचित हा फोटो त्यांचा दिवाळी सेलिब्रेशनचा असावा असा कयास नेटकऱ्यांमध्ये लावला जात आहे.

अनुष्काच्या या पोस्टवर विराटने कमेंट करत लिहिले, “तू माझी ताकद आहेस, तू माझी मार्गदर्शक फोर्स आहेस, आपण दोघं सोबत आहे, यासाठी मी रोज देवाला धन्यवाद म्हणतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

तत्पूर्वी अनुष्का आणि विराटने २०१७ साली इटलीमध्ये खासगी समारंभात लग्न केले. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये या दोघांना एक मुलगी झाली जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा