‘गिला गिला गिला’ गाण्यावर थिरकली अंकिता; तिच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल घायाळ


‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’ या सिनेमातून थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रेक्षकांना नव्या रुपात दिसणारी अंकिता लोखंडेने आपल्या उत्तम अभिनयासोबतच डान्सच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. लॉकडाऊन दरम्यान अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबविण्यात आल्यामुळे कित्येक कलाकारांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली. यामध्ये अंकिताचाही समावेश आहे. सध्या अंकिताचा एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अंकिता ही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध व्हिडिओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्यामार्फत तिच्या डान्सला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे माधुरी दीक्षित हिच्या ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर आपल्या कातिल अदांनी तिच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. त्या व्हिडिओला तुफान प्रतिसाद देखील मिळाला होता. परंतु आता ती पुन्हा एकदा आपल्या डान्सचा नवीन व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. ज्यात ती ‘गिला गिला गिला’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

हा व्हिडिओ अंकिताने आपल्या इंस्टाग्राम रीलवर शेयर केला होता. या व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. ‘गिला गिला गिला…’ या गाण्यावर ती जबरदस्त अंदाजामध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने त्यात लिहिले आहे की, “गिला गिला गिला गिला…. प्रिय इन्स्टाग्राम रील. माझे तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू मला नेहमीच आनंदी ठेवतोस.” या व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

अंकिता लोखंडेचा काळ्या रंगाच्या कपड्यांवरील ‘लाल इश्क’ गाण्याचा डान्स व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ टाकत ती प्रेक्षकांचे लक्ष विचलित करत असते. प्रत्येक व्हिडिओतील तिचा अंदाज खूपच वेगळा असतो.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे हिचे सुशांत सिंग राजपूतसोबत असलेले प्रेम प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला होता. यासोबतच ती ‘झलक दिखला जा ४’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘एक थी नायिका’ या कार्यक्रमात देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अफ़गान जलेबी, माशूक फ़रेबी! बॉलीवूडची चिकणी चमेली कॅटरिनाने लावले जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ
-आयुष्यात संतुलन महत्त्वाचे आहे, नाहीतर सनीसारखं चालता चालता पडाल स्विमींग पुलमध्ये
-आजीबाईंनी वयाच्या ६२ व्या वर्षी धरला ठेका; व्हिडिओ पाहून दिलजीत दोसांज आणि इम्तियाज अलीही बनले चाहते


Leave A Reply

Your email address will not be published.