आजीबाईंनी वयाच्या ६२ व्या वर्षी धरला ठेका; व्हिडिओ पाहून दिलजीत दोसांज आणि इम्तियाज अलीही बनले चाहते

Dancing Dadi At Age of 62 Has Killer Dance Moves Diljit Dosanjh And Others Blown Away Watch Video


‘डान्स’ करणे कुणाला आवडत नाही? अर्थातच सर्वांना आवडतो… डान्स करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी अनेक व्हिडिओंमधून आला आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना आपण डान्स करताना पाहिलं आहे. आता असाच एका ६२ वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील आजीबाईंचं नाव रवी बाला शर्मा असं आहे. त्यांनी नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. त्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या डान्सची प्रेक्षकांकडून जोरदार प्रशंसा केली जात आहे. याव्यतिरिक्त प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांज, दिग्दर्शक इम्तियाज अली आणि डान्सर टेरेन्स लुईस यांसारखे सेलिब्रिटींही या आजीबाईंचे मुव्हज पाहून त्यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी हे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. दिलजीतनेही हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

रवी बाला यांनी सांगितले की, “मला लहानपणापासूनच डान्स करण्याची आवड होती. जेव्हाही मला संधी मिळायची, तेव्हा मी माझ्या खोलीत दरवाजा बंद करून डान्स करत असायचे.” तरीही, त्यांच्या लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांसमोर त्यांना त्यांची ही आवड मागे टाकावी लागली. त्यांनी सांगितले की, “कॉलेजनंतर मी लग्न केले आणि जस-जसे घरातील, तसेच इतर जबाबदाऱ्या वाढल्या, तस-तसे माझा डान्स बंद झाला.” परंतु लग्नाच्या २७ वर्षानंतर जेव्हा पतीचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांनी सांगितले की, “माझ्या पतीच्या निधनानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. माझ्या कुटुंबाने मला पुन्हा डान्स करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी मला आठवण करून दिली की, माझा डान्स पाहणे हे माझ्या पतीचे स्वप्न होते.” रवी बाला शर्मा यांची बहीण एका डान्स स्पर्धेसाठी त्यांना घेऊन गेली होती. त्यानंतर त्यांनी ऑडिशनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर त्यांना खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत ६ लाखांपेक्षाही अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यांची सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे, यामुळे त्या खूप खुश आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, “वाढत्या वयालाही तुम्ही आपली कमजोरी बनू दिली नाही पाहिजे.”

इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्यानंतर रवी बाला म्हणतात की, “माझे डान्सबद्दल पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आजीबाईंचे हिंदी गाण्यावर जोरदार ठुमके, पाहा अभिनेत्री अदा शर्माच्या आजीचा हा व्हायरल डान्स व्हिडीओ

-मुकेश अंबानीच्या नातवाचं झालं बारसं, पणजी-आजीने ठेवलं ‘हे’ नाव

-आय्योवं.!! चालू व्हिडिओमध्येच अभिनेत्रीने बदलले कपडे; पाहा हिना खानचा आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड’ व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.