नुकत्याच झालेल्या ओटीटी प्ले नामांकन सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये काही सेलिब्रीटींना नामांकनही मिळाले आहेत. या सगळ्या कार्यक्रमात मात्र, एका जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे ती म्हणजे, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाणून घेऊया व्हिडीओबद्दल पुर्ण माहिती.
गेल्या काही दिवसापासून कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) पाठोपाठ गाजणारे चित्रपट देत आहे. त्यामुळे तो खूपच चर्चेत असतो. मुंबई मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘ओटीटी प्ले’ नामांकन सोहळ्यामध्ये अभिनेत्यासोबत अनेक सेलिब्रिटीं आणि सारा अली खन(Sara Ali Khan) आली होती. त्यामुळे जुने कपल पुन्हा एकदा सोबत पाहायला मिळाले होते. या जोडप्याने एकत्र बसून गप्पा मारत असताना सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहते खूपच पसंत करत आहेत.
View this post on Instagram
या व्हि़डीओमध्ये कार्तिक आर्यन काळ्या रंगाचे ब्लेजर, पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाच्या टाईमध्ये दिसत आहे. आणि सारा अली खान पिवळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान करुन आली होती. दोघे एकत्र बसून हसत हसत गप्पा गोष्टी करत होते. कार्तिक आणि सारा यांचे ब्रेकअप होउनही हे दोघे चांगल्या मैत्रीच्या नात्यात पाहुन चाहतेही खूपच खूश आहेत.
यांची ही व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनच्या हातात ट्रॉफी दिसत आहे आणि सारा सोबत एका मुद्द्यावर बोलताना दिसत आहे. सारा देखील कार्तिकच्या बोलण्याला एन्जॉय करत असून त्याच्यासोबत खूप प्रेमाने बोलत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसाठी खूपच खास आहे कारण हे जोडपे एकेकाळी एकमेकांना डेट करत असून एकत्र चित्रपटामध्ये कामही केले आहे.
हा पहिला ‘ओटीटी प्ले’ नामांकन सेहळा आहे ज्याचे आयोजन मुंबईमध्ये केले होते. शनिवार (दि.10 सप्टेंबर) दिवशी संध्याकाळी रेड कार्पेटवर अनेक स्टार पहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमात सांगितले होते की, तिला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे. आणि यानंतर दोघांनी ‘लव आजकल’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
अटकेच्या मागणीनंतर गायक जुबीन नौटियालची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला आता देश…’
आहा कडकच ना! साराचा हटके अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, फोटो गॅलेरी पाहाच
साऊथच्या सिंघम सूर्याची पत्नी ज्योतिकालाही मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कार, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी