Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर लय भारी! बॉलिवूड कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पद्मश्री’ पुरस्कारावर कोरले आपले नाव

लय भारी! बॉलिवूड कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पद्मश्री’ पुरस्कारावर कोरले आपले नाव

‘भारतरत्न’ या पुरस्कारानंतर देशातील सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल, तर तो ‘पद्म पुरस्कार’ होय. आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सोमवारी (०८ नोव्हेंबर) देशातील अनेक प्रसिद्ध कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कंगना रणौतला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात कंगना उपस्थित होती. खरं तर, या पुरस्काराची घोषणा मागील वर्षी २६ जानेवारीलाच झाली होती. मात्र, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होऊ शकले नव्हते. (Padam Shri Award Winner Actress Kangana Ranaut To Karan Johar Know Full List)

पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी भारत सरकारने कंगना, एकता आणि करण यांना आधीच निमंत्रण पाठवले होते.

सोमवारी (०८ नोव्हेंबर) या पुरस्कार सोहळ्याचा पहिला टप्पा पार पडला आहे. यादरम्यान रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२० साठी वेगवेगळ्या क्षेत्रात आपापले योगदान देणाऱ्या १४१ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. आता या पुरस्कार सोहळ्याचा दुसरा टप्पा हा मंगळवारी (०९ नोव्हेंबर) होणार आहे. यादरम्यान ११९ व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मंगळवारीच करण जोहर आणि एकता कपूर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या सन्मान सोहळ्यात एकता कपूरसोबत तिचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते जीतेंद्रही सामील होतील. यासाठी त्यांनी सर्व औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या आहेत.

भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मभूषणनंतर पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.

चला तर कलाविश्वातून कोणकोणत्या व्यक्तींना देशाचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत, त्याची यादी पाहूया…

१. छन्नू लाल मिश्रा (उत्तरप्रदेश)- पद्म विभूषण
२. अजॉय चक्रवर्ती (पश्चिम बंगाल)- पद्म भूषण
३. गुरु शशाधर आचार्य (झारखंड)- पद्मश्री
४. इंदिरा पी. पी. बोरा (आसाम)- पद्मश्री
५. मदन सिंग चौहान (छत्तीसगड)- पद्मश्री
६. सरोज चिदंबरम (तमिळनाडू)- पद्मश्री
७. वझीरा चित्रसेन (श्रीलंका)- पद्मश्री
८. पुरुषोत्तम दधीच (मध्यप्रदेश)- पद्मश्री
९. उत्सव चरणदास (ओडिशा)- पद्मश्री
१०. मनोहर देवदास (तमिळनाडू)- पद्मश्री
११. यादला गोपालराव (आंध्रप्रदेश)- पद्मश्री
१२. मित्रभानू गोंटिया (ओडिशा)- पद्मश्री
१३. मधू मंसूरी हसमुख (झारखंड)- पद्मश्री
१४. सुश्री शांति जैन (बिहार)- पद्मश्री
१५. करण जोहर (महाराष्ट्र)- पद्मश्री
१६. सरिता जोशी (महाराष्ट्र)- पद्मश्री
१७. एकता कपूर (महाराष्ट्र)- पद्मश्री
१८. यादजी नाओश्रीवान करंजिया (गुजरात)- पद्मश्री
१९. वी. के. मनुसामी कृष्णा पख्तहर (पुद्दुचेरी)- पद्मश्री
२०. मनमोहन महापात्रा (मरणोत्तर) (ओडिशा)- पद्मश्री
२१. उस्ताद अन्वर खान मंगनियार (राजस्थान)- पद्मश्री
२२. मुन्ना मास्टर (राजस्थान)- पद्मश्री
२३. मणिलाल नाग (पश्चिम बंगाल)- पद्मश्री
२४. मुझिक्कल पंकजाक्षी (केरळ)- पद्मश्री
२५. कंगना रणौत (महाराष्ट्र)- पद्मश्री
२६. दलवई चलापतिराव (आंध्रप्रदेश)- पद्मश्री
२७. अदनान सामी (महाराष्ट्र)- पद्मश्री
२८. शाम सुंदर शर्मा (बिहार)- पद्मश्री
२९. दया प्रकाश सिन्हा (उत्तरप्रदेश)- पद्मश्री
३०. कली शाबी महबूब आणि शेक महबूब सुबानी (तमिळनाडू)- पद्मश्री
३१. सुरेश वाडकर (महाराष्ट्र)- पद्मश्री

हे देखील वाचा