Saturday, June 29, 2024

दिग्गज पाकिस्तानी कलाकार कवी खान यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन

पाकिस्तानमधल्या मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी अभिनेता कवी खान यांचे दुःखद निधन झाले आहे. कवी खान यांनी ५ मार्च रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कवी खान यांचे कॅनडामध्ये निदान झाले. ते तिथे उपचारासाठी गेले होते. एका माहितीनुसार ते कॅन्सरने ग्रस्त होते.

प्राप्त माहितीनुसार कवी खान यांचा मुलगा असणाऱ्या अदनानने त्यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. त्याने हे देखील सांगितले की कवी यांच्या अंतिम संस्क्राची तारीख आणि वेळ लवकरच कळवण्यात येईल. मात्र त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कवी खान यांच्यावर ६ मार्च रोजी कॅनडामध्ये अंतिम संस्कार केले गेले. मिसिसॉगा येथील एका मस्जिदमध्ये जोहरच्या नमाज झाल्यानंतर अंतिम नमाज पठण केली जाईल. त्यानंतर कवी खान यांना ब्रैम्पटन मध्ये मीडोविले कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात येईल.

या बातमीमुळे संपूर्ण पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोकाचे वातावरण आहे. कलाकारणपासून ते राजनेत्यांपर्यंत सर्वच लोकांनी कवी खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. यासोबतच अली जफरपासून फरहान सईदपर्यंत सर्वच कलाकारांनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. भारतीय गायक अदनान सामीने देखील त्यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहताना ट्विट केले आहे.

पेशावरचे राहणारे कवी खान यांनी त्यांच्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून १९६४ साली केली. पुढे त्यांनी ‘लाखों में एक’ या मालिकेतून अभिनेता साकारला. त्यानंतर त्यांनी फिसार, लाहौरी गेट, मुट्ठी भर मट्टी, बैत्यान, सिंड्रेला, दूर-ए-शहवार आदी मालिकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांना प्रेसिडेंशियल अवार्ड, प्राइड ऑफ परफॉर्मेंस, सितारा-ए-इम्तियाज, एलएसए लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड. तीन निगार अवार्डसोबत अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा