Friday, July 5, 2024

व्हिडिओ: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर अडकली लाेकांच्या गर्दीत, रागाने झाली लाल

सेलिब्रिटी कोणत्याही देशाचे असोत, त्यांचे चाहते जगभर आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्या-अभिनेत्रींना पाहण्याची कोणाची इच्छा नसते, आणि जेव्हा जेव्हा तुमचे आवडते कलाकार तुमच्या डोळ्यासमोर येतात, तेव्हा तुम्हालाही त्यांच्यासोबत सेल्फी काढायला आवडेल आणि असे दृश्य आपण मायानगरी मुंबईत रोज पाहतो. परंतु जर आपण सेलिब्रिटींबद्दल बोललो तर, त्यांचे एक नाही तर लाखो चाहते आहेत जे दररोज त्यांना एक ना एक भेटतात आणि त्यांच्याशी सेल्फी काढून त्यांच्याशी संंवाद साधण्यात उत्साही असतात. अशात कधीकधी सेलीब्रेटी बोलायला कचरतात आणि कधीकधी नाराजही होतात. असेच काहीसं पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाले, जेव्हा चाहत्यांनी अभिनेत्रीला भेटायसाठी प्रचंड गाेंधळ केला परिणामी त्याला कंटाळून अभिनेत्रीनं लाेकांनवर चांगलीच टीका केली.

सध्या हानिया आमिर (hania aamir) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक हानियाला पाहण्यासाठी रस्त्यावर दिसत आहेत आणि त्याच गर्दीत हानिया आपल्या कारकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती लोकांमध्ये इतकी अडकते की, तिला तिच्या गाडीजवळ जाता येत नाही आणि तिला राग येतो. व्हिडिओमध्ये ती रागाने लाल झालेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by showbiz Lovers (@showbizloverss)

हानिया आमिरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अनेक लोक इन्स्टाग्रामवर प्रचंड कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीच्या बाजूने बोलत आहेत. लोक हानियाला सपोर्ट करताना दिसत आहेत. इंस्टाग्राम युजर्सचे म्हणणे आहे की, “लोकांनी अशाप्रकारे हानियासोबत करायला नव्हते पाहिजे.”

काेण आहे हानिया आमिर?
हानिया अमिर पाकिस्तानची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी आपल्या दमदार अभिनयामुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवते आणि पाकिस्तानमध्ये तिचा माेठा चाहता वर्ग आहे. (pakistani actress hania aamir viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध निर्मात्याने रणवीरच्या मागे सोडला कुत्रा, खासगी पार्टीत अभिनेत्यासोबत केले ‘असे’ घाणेरडे कृत्य

जया बच्चन अन् महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट चर्चेत, राजकारणातील मोठ्या मंत्र्याविरुद्ध केली तक्रार

हे देखील वाचा