Sunday, May 19, 2024

अरेरे! रँप वॉकसाठी सजून आलेली पाकिस्तानी अभिनेत्री; पण पुढे जे झालं, त्यामुळे देशात उडवली गेली थट्टा

कलाकारांना ट्रोल होण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही. ते त्यांच्या कपड्यांवरून, चाहत्यांना दिलेल्या वागणुकीवरून, पॅपाराजींशी उद्धटपणे बोलल्यावरून अशा अनेक कारणांवरून ट्रोल होतात. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री उर्वा होकेन ही एका भलत्याच कारणामुळे ट्रोल होत आहे. ती नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या स्टाईलमुळेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होतोय व्हिडिओ
खरं तर, पाकिस्तानी अभिनेत्री उर्वा होकेन (Pakistani Actress Urwa Hocane) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री पँटीन ब्रायडर कोर्चर वीकमध्ये डिझायनर रीमा एहसानसाठी रँप वॉक करताना दिसत आहे. व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, उर्वा रँपवर चालण्यासाठी पुढे येताच, तिची पावलं डगमगू लागतात. यावेळी तिला पाहून असे वाटते की, ती रँपवर पडते की काय. मात्र, ती कसं तरी अडखळत आपले रँप वॉक पूर्ण करते.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल
अभिनेत्रीचा हा खराब रँप वॉकचा व्हिडिओ पाहून पाकिस्तानमध्येच तिची थट्टा उडवली जात आहे. एका युजरने लिहिले की, “पुढच्या वेळी रँप वॉकसाठी मॉडेल्सला भाड्याने घ्या.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “बायको, तुझा लेहंगा पुढच्या बाजूने थोडा वर घे… चालताना तुला अडचण येणार नाही.” काहींनी तिच्या स्लीव्हवरील कटआऊट डिझाईनचीही थट्टा उडवली. एकाने लिहिले की, “सगळे फाटलेले कपडे घातलेत हिला.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “उर्वा, हे तुला नाही जमणार.”

खरं तर, रँप वॉकसाठी पाकिस्तानी अभिनेत्री उर्वा होकेन हिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तिच्या या लेहंग्यावर पांढऱ्या रंगाची वजनदार एम्ब्रॉयडरी आहे. व्हिडिओत दिसते की, अभिनेत्रीने लेहंगा चोलीवर मोठा श्रगही घेतला आहे. यासोबतच तिने तिचा लूक परिपूर्ण करण्यासाठी लेहंग्यावर मॅचिंग पांढऱ्या रंगाचा नेकलेस, झुमके आणि टिक्क्याचाही आधार घेतला आहे.

उर्वाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती 2017 साली आलेल्या ‘पंजाब नहीं जाऊंगी’ या सिनेमासाठी ओळखली जाते. ती ‘तीच बटन’ या कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हीच का आपली संस्कृती’, ऐश्वर्याने मुलीच्या ओठांवर किस करताच भडकले नेटकरी, सोशल मीडियावर एकच खळबळ
काय सांगता! सेक्स सीन करण्यासाठी अभिनेत्रीला एक्स पतीने केली होती मदत; म्हणाली, ‘मी डोळे…’

हे देखील वाचा