Friday, May 24, 2024

‘हीच का आपली संस्कृती’, ऐश्वर्याने मुलीच्या ओठांवर किस करताच भडकले नेटकरी, सोशल मीडियावर एकच खळबळ

बॉलिवूड कलाकारांची प्रसिद्धी जगात सर्वत्र असल्याचे आपल्याला माहितीच आहे. मात्र, त्यांची मुलंही काही कमी नाहीत. कलाकारांची मुले आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. तसेच, कलाकार आपल्या मुलांसोबत असे काही तरी करतात, ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्याशिवाय राहत नाहीत. आता असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत झाले आहे. ज्यामुळे नेटकऱ्याकडून ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल होत आहे.

खरं तर, बुधवारी (दि. 16 नोव्हेंबर) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची लेक आराध्या बच्चन हिचा 11 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास क्षणी ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलीवर प्रेम व्यक्त केले आहे. तिने आराध्याच्या ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. आता ऐश्वर्याचे मुलीच्या ओठांवर किस करणे (Aishwarya Kiss Daughter On Lips) काही नेटकऱ्यांना पटले नाहीये. काहींनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. इतकेच नाही, तर काही लोक कमेंट्समध्ये एकमेकांशी भिडले आहेत.

झालं असं की, ऐश्वर्याने रात्री जवळपास 12 वाजता आराध्याच्या वाढदिवशी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोत आराध्या आणि ऐश्वर्या लिप किस करताना दिसत आहेत. तसेच, त्यांच्या मागे फुलांनी 11 लिहिले आहे. यावरून असे दिसते की, आराध्याच्या रात्री केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो आहेत. हे फोटो शेअर करत ऐश्वर्याने लिहिले की, “माझे प्रेम, माझे आयुष्य, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे…माझी आराध्या.”

ऐश्वर्याच्या पोस्टनंतर एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत. काहींनी असे म्हटले आहे की, मुलांच्या ओठांवर किस करणे आमची संस्कृती नाहीये. तर काहींनी असे म्हटले की, असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाही पाहिजेत. एकाने लिहिले की, “आई मुलीच्या ओठांवर किस करेल, हे बिल्कुल योग्य नाही.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मुलीच्या ओठांवर किस करणे खूपच विचित्र आहे.” आणखी एकाने लिहिले की, “तुम्ही असे प्रेम करत आहात, ते ठीक आहे. मात्र, असे फोटो शेअर करू नका.”

दुसरीकडे, काही चाहते ऐश्वर्याचे समर्थन करत आहेत. त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एका चाहत्याने लिहिले की, “मला त्या लोकांसाठी खूपच वाईट वाटत आहे, जे या पोस्टवर घाणेरड्या कमेंट करत आहेत. एकदा कमेंट करण्यापूर्वी विचार करा, तुमच्याही आई-बहिणी आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आई-मुलीच्या नात्याला असे जज करणे बंद करा. ही फक्त एक किस आहे, ज्याचा अर्थ प्रेम आहे.”

ऐश्वर्याच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती 2022मध्ये रिलीज झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमात झळकली होती. 2023मध्ये याच सिनेमाच्या दुसऱ्या भागातही ती दिसणार आहे. चाहत्यांची या सिनेमासाठीची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! सेक्स सीन करण्यासाठी अभिनेत्रीला एक्स पतीने केली होती मदत; म्हणाली, ‘मी डोळे…’

धक्कादायक! संगीतकार किशोर ब्रिज दुबे यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

हे देखील वाचा