Thursday, July 18, 2024

पाचव्या पतीसोबत घटस्फोट घेणार ‘बिग बॉस’ची ‘ही’ माजी अभिनेत्री, जाणून घ्या का तुटले ५ लग्न?

अमेरिकन अभिनेत्री पामेला अँडरसनने (Pamela Anderson) तिचा पाचवा पती डॅन हेहर्स्टपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पामेलाने डॅनपासून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला आहे. हे लग्न केवळ १३ महिने टिकले. ५४ वर्षीय पामेला अँडरसनने डिसेंबर २०२० मध्ये तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्टशी विवाह केला होता. मात्र आता दोघेही वेगळे होणार आहेत. 

पामेला अँडरसनने तिच्या पतीपासून अल्पावधीत घटस्फोट घेण्याची होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिने आतापर्यंत पाचवेळा लग्न केले असून, तिचे एकही लग्न यशस्वी झालेले नाही. गेल्या वर्षी पामेलाने डॅनला भेटून लग्न करण्याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती की, डॅन ही अशी व्यक्ती आहे ज्यासोबत तिला राहायचे आहे. मात्र आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. (pamela anderson files for divorce from fifth husband dan hayhurst)

साल १९९५ मध्ये पामेला अँडरसनने ड्रमर टॉमी लीला ओळखल्यानंतर, अवघ्या ४ दिवसांनी त्याच्याशी लग्न केले होते. तिने हा विवाह समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून केला होता. या लग्नातून टॉमी आणि पामेला यांना दोन मुले झाली. टॉमीवर पामेलावर गैरवर्तन केल्याचा आरोप होता. पामेलावर हल्ला केल्याप्रकरणी त्याला सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती. हे लग्न १९९८ मध्ये मोडले.

टॉमी लीशी घटस्फोट घेतल्यानंतर, पामेलाने मॉडेल मार्कस शेंकेनबर्गशी साखरपुडा केला. मात्र हा साखरपुडा २००१ मध्ये तुटला. यानंतर पामेलाने किड रॉकसोबत साखरपुडा केला. त्यानंतर २००३ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. २००६ मध्ये पामेलाने घोषणा केली की, ती किड रॉकशी लग्न करत आहे. पामेला आणि किड रॉक यांनी २९ जुलै २००६ रोजी एका यॉटवर लग्न केले होते.

पण सेंट ट्रोपमधील हे लग्न केवळ एक वर्ष टिकले. नोव्हेंबर २००६ मध्ये पामेला अँडरसनचा गर्भपात झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर ती तिच्या ‘Blonde and Blonder’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. यानंतर १७ दिवसांनंतर पामेलाने किड रॉकपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. किड रॉकच्या रागामुळे हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. ‘बोरत’ चित्रपटात पामेलाला पाहून तो संतापला होता. हा घटस्फोट २९९७ मध्ये झाला होता.

सप्टेंबर २००७ मध्ये, पामेला अँडरसनने एका टॉक शोमध्ये सांगितले की, तिचे लग्न झाले आहे. तिने ऑक्टोबर २००७ मध्ये निर्माता रिक सॉलोमनशी लग्न केले होते. डिसेंबरमध्ये दोघे वेगळे झाले आणि फेब्रुवारी २००८ मध्ये पामेलाने लग्न रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज केला. तिने या लग्नाला फसवणूक म्हटले होते.

साल २०१७ ते २०१९ पर्यंत, पामेला अँडरसनने फ्रेंच फुटबॉलपटू आदिल रामीला डेट केले. जानेवारी २०२० मध्ये तिने निर्माता जॉन पीटर्सशी लग्न केले. दोघांच्या वयात २२ वर्षांचा फरक होता. एक महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये पामेला आणि जॉन वेगळे झाले. पामेलाने सांगितले की, जॉनशी तिचे कायदेशीर लग्न झाले नव्हते.

जॉन पीटर्स आणि पामेला अँडरसन यांची पहिली भेट ८०च्या दशकात झाली होती. जेव्हा पामेला फक्त १९ वर्षांची होती. २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जॉनने सांगितले होते की, त्यावेळी त्याने पामेलाला लग्नासाठी विचारले होते आणि अभिनेत्रीने नकार दिला होता. कारण होते दोघांमधील वयाचे २२ वर्षांचे अंतर. डिसेंबर २०२० मध्ये पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्टशी लग्न केले आणि आता दोघेही वेगळे होत आहेत.

विशेष म्हणजे, पामेला ‘बिग बॉस सीझन ४’ चा भाग देखील होती. त्यामुळे आज भारतात तिचे अनेक चाहते आहेत. 

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा