Sunday, July 14, 2024

सोनाली कुलकर्णी अन् भाऊ कदमचा ‘पांडू’ ‘या’ तारखेला येणार छोट्या पडद्यावर, वाचा सविस्तर

मराठी चित्रपट सृष्टीतील ‘पांडू’ या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. या चित्रपटात कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) या जोडीने चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटातील एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातील प्रत्येक पात्राला एक वेगळी व ओळख आणि वजन होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटात तिच्या बिनधास्त पात्राला चाहत्यांनी भरभरुन प्रेम व प्रतिसाद दिला. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

‘पांडू’ चित्रपटातील पांडूने आणि केळीवाल्या उषाच्या भूमिकेने चित्रपटगृहात धुमाकूळ घातला. इतकेच नाही, तर चित्रपटाच्या टिझरपासून ते गाण्यापर्यंत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. हा चित्रपट ३० जानेवारीला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरवर प्रसारित होणार आहे.

‘पांडू’ या चित्रपटाचे विजू माने यांनी प्रेक्षकांना हसवण्याची कोणतीही कसर सोडली नाही. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. तर या चित्रपटाला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. हा चित्रपट पाण्यासाठी आता प्रेक्षकांना चित्रपट चित्रपटगृहात जाण्याची गरज भासणार नाही.

आता ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षक आपल्या घरातील टीव्हीवर पाहू शकतात. मनोरंजनाचा फुल-टू-धमाका असलेल्या या चित्रपटात भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रिके, प्रवीण तरडे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील उत्तम भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात प्राजक्ता माळीने नकारात्मक भूमिका साकारली आहे. मात्र तरी देखील तिने चाहत्यांच्या मनावर सकारात्मक छाप पाडली आहे. तिची भूमिका राजकारण्याची आहे. अत्यंत साध्या आणि गोड दिसणाऱ्या चित्रपटात अतिशय कठोर भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ या गाण्याला अवघ्या २४ तासांत २० लाख व्ह्यूज मिळाले. तर केळेवाली गाण्याने अवघ्या २४ तासात १० लाखांचा टप्पा पार केला होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेल्या कलाकारांच्या स्टारकास्टने सजलेला ‘पांडू’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा