Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड शाहिद कपूरची बहीण सना अडकणार विवाहबंधनात, वडील पंकज कपूर यांनी दिली माहिती

शाहिद कपूरची बहीण सना अडकणार विवाहबंधनात, वडील पंकज कपूर यांनी दिली माहिती

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. अलीकडेच फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नानंतर शाहिद कपूरची बहीण सना कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. सना मनोज आणि सीमा पाहवा यांचा मुलगा मयंकसोबत लग्न करणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांची मुलगी सना कपूर हिचे महाबळेश्वरमध्ये २ मार्च रोजी लग्न होणार आहे.

होय, शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘शानदार’ चित्रपटात दिसलेली सना लग्नाच्या बेडीत अडकणार आहे आणि घरातील सदस्य त्यामध्ये खूप व्यस्त आहेत. लग्नाच्या आदल्या रात्री सनाच्या लग्नापूर्वीचे कार्य मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. जिथे कुटुंबातील सदस्यांनी मेहंदी आणि संगीत समारंभाचा आनंद लुटला.

माध्यमांनी कुटुंबीयांकडून याबाबत जाणून घ्यायचे असता त्यांचे वडील पंकज कपूर यांनी याला दुजोरा दिला. पंकज कपूरने फोन उचलला तेव्हा मागून जोरात संगीत वाजत होते. यावेळी जल्लोषाच्या वातावरणात हे कुटुंब मग्न झाल्याचे दिसत होते.

आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि क्रिती सेनन अभिनित ‘बरेली की बर्फी’चा ‘स्वीटी तेरा ड्रामा’ सुरू होता, जो उत्सवाच्या दिशेने सूचित करतो. शेवटी पंकज कपूर रूमच्या बाहेर आले आणि बोलले आणि म्हणाले की, ”मी या बद्दल जास्त बोलू शकत नाही, पण हो माझ्या मुलीचे लग्न आहे.” कपूर आणि पाहवा हे कौटुंबिक मित्र असल्याचे म्हटले जात आहे. सना आणि मयंक खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि काही काळापूर्वी दोघांनी एंगेजमेंट केली होती.

नीलिमा अजीम यांनी पंकज कपूरसोबत लग्न केले तेव्हा त्या १६ वर्षांच्या होत्या. तर पंकज कपूर २१ वर्षांचे होते. दोघांनी १९७५ मध्ये लग्न केले. नीलिमा आणि पंकज यांनी लग्नाच्या ९ वर्षानंतर १९८४ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. नीलिमा आणि पंकज एकमेकांपासून वेगळे झाले, तेव्हा शाहिद कपूर केवळ साडेतीन वर्षांचा होता. नीलिमा यांनी एकट्याने शाहिद कपूरला मोठे केले. नीलिमा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, पंकज त्यांना चित्रपट आणि टीव्हीमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत सोडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या गरोदरपणाबद्दल कळले होते. नीलिमा यांनी शाहिद कपूरला सिंगल मदरप्रमाणे वाढवले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शाहिदचे चांगले चित्रपट आता प्रदर्शनासाठी साठी तयार आहेत. शाहिद कपूर लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, तो राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित थ्रिलर ड्रामा वेबसीरिज तसेच अली अब्बास जफरच्या शीर्षक नसलेल्या ऍक्शन फिल्ममध्ये देखील दिसणार आहे. याशिवाय शाहिद आदित्य निंबाळकरच्या ‘वळू’ या चित्रपटातही दिसणार आहे. जो एप्रिल २०१३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा