बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj tripathi) हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या मेहनतीमुळे हे स्थान मिळवले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठींनी ओटीटीवरही स्वतःची छाप सोडली आहे. मात्र त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे. पंकज त्रिपाठी यांच्याबद्दलचा असाच एक किस्सा आज आपण पाहणार आहोत.
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अत्यंत कठिण परिस्थितीतून मार्ग काढत अभिनय क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. या अभिनेत्यांमध्ये पंकज त्रिपाठी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आज पंकज त्रिपाठी यांच्या इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळालेले अभिनेते खूपच कमी आहेत आणि हेच त्यांच्या अभिनयाचे विशेष यश आहे. पंकज त्रिपाठी हे चित्रपट जगतातील एक प्रतिभावान अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा करताना अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी एक किस्सा सांगितला होता.
वास्तविक, पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. मुलाखतीदरम्यान, त्यांनी स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना सांगितले की, ते १९९३ मध्ये मृदुलाला भेटले होते आणि २००४ मध्ये त्यांनी मृदुलासोबत लग्न केले. याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यावेळी त्यांच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच त्यांनी पत्नीला मुलांच्या वसतिगृहात सोबत ठेवले होते. त्यांनी पुढे खुलासा केला की, मुले वसतिगृहात खूप आरामदायक असतात. मात्र, माझी पत्नी मृदुलासोबत राहिल्याने ते अतिशय सभ्य पद्धतीने राहत होते. पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले की, “काही काळाने वॉर्डनला ही बाब कळाली. त्यांनंतर एके दिवशी वॉर्डन माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले की भाड्याच्या घरात कधी शिफ्ट होत आहात.” हा किस्सा ऐकून कार्यक्रमातील सर्वच जण चकित झाल्याचे पाहायला मिळाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-