सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. काही काळापासून बंद असलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमोचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेत्री नव्हेतर एक दिग्गज महिला राजकारणी करणार आहे. काय आहे ही संपूर्ण बातमी, चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘उंच माझा झोका’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष असेल. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज महिला ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे, अशा महिलांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा भाजपा नेत्या पंकजा मुंडे सांभाळणार आहेत. ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. पंकजा मुंडेंसोबत अभिनेत्री क्रांती रेडकरही सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकरची जुगलबंदी पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मनोरंजन जगतात दिग्गज राजकारण्यांची एंट्री होणे काही नवीन नाही. याआधीही अनेक कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला होता. अलिकडेच किचन कलाकार या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर चला हवा येऊ द्या मध्येही आमदार रोहित पवार यांनी सपत्निक हजेरी लावली होती.
हेही वाचा – KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह
वयाच्या १२ व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते २२ वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे दिलीप कुमारांसोबत त्यांची ‘लव्हस्टोरी’
KK struggle | केके सुरुवातीला करत होते हॉटेलमध्ये काम, हरिहरन यांच्या सांगण्यावरून गाठली मुंबई, वाचा तो किस्सा