बॉलिवूडमधील ‘बाबूराव’ म्हणजेच अभिनेता परेश रावल (paresh raval) हे गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी मनोरंजनासोबतच राजकारणात देखील त्यांचा दबदबा दाखवला आहे. ते सन 2014 ते 2019 यादरम्यान अहमदाबादमधून खासदार होते. भारतीय जनता पक्षामधून तिकीट घेऊन त्यांनी निवडणूक जिंकली होती. राजकारणातील त्यांची कारकीर्द देखील कौतुकास्पद होती. पण अभिनयात ते नेहमीच उजवे सिद्ध झाले आहेत. विनोदी कलाकारापासून ते खलनायकापर्यंत त्यांनी अनेक भूमिका यशस्वीरीत्या पार करून त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. मंगळवारी(30 मे)ला परेश रावल त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त जाणून घेऊया प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या अभिनेत्याच्या कारकिर्दीमधील पाच सर्वोत्तम भूमिकांविषयी…
बाबूराव
परेश रावल हे विनोदाचे बादशाह आहेत, या गोष्टीला कोणीच नकार देऊ शकत नाही. त्यांनी पडद्यावर ‘बाबूराव गणपतराव आपटे’ हे पात्र निभावून सर्वांचे मनोरंजन केले आहे. ‘हेरा फेरी’ (hera pheri) मधील ‘बाबू भैया’ या पात्राने तर कमालच केली होती. त्यांचा हा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. या सोबतच त्यांचे अनेक डायलॉग देखील प्रसिद्ध झाले होते.
मिस्टर खान
‘टेबल नंबर 21’ (table no. 1) या चित्रपटात परेश रावल यांनी ‘मिस्टर खान’ नावाच्या एका व्यावसायिकाचे पात्र निभावले होते. या चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते हा चित्रपट संपेपर्यंत त्याचे पात्र ग्रे शेडमध्ये होते. परंतु चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्याच्या खऱ्या रूपाचा खुलासा झाला. त्याने या चित्रपटात त्याच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले होते.
घुंघरू शेठ
‘वेलकम’ या चित्रपटात परेश रावल यांनी ‘घुंगरू शेठ’ (ghungaru sheth) नावाच्या एका डॉक्टरची भूमिका निभावली होती. जो त्याच्या भाच्याच्या लग्नामुळे खूप वैतागलेला असतो. त्याला त्याच्या भाच्याचे लग्न एका चांगल्या घरात करायचे होते पण त्याचे लग्न एका मोठ्या डॉनच्या बहिणीशी ठरते.
कांजी भाई
‘ओह माय गॉड’ (oh my god) या चित्रपटात परेश रावल हे ‘कांजी भाई’ या मुख्य भूमिकेत दिसले होते. ते एका अशा व्यापाऱ्याच्या भूमिकेत होते. ज्याचा देवावर अजिबात विश्वास नाहीये. जेव्हा भूकंपात त्याच्या दुकानाचे नुकसान होते ते थेट देवावर केस दाखल करतात. त्याचा हा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.
सुनील दत्त
संजय दत्त यांच्या बायोपिकवर बनलेल्या ‘संजू’ या चित्रपटात परेश रावल यांनी ‘सुनील दत्त’ हे पात्र निभावले होते. या चित्रपटात रणबीर कपूर हा संजय दत्तच्या मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील त्यांचा अभिनय सर्वांना खूप आवडला होता.(paresh rawal birthday special these 5 best character of his career)