परेश रावल (paresh raval) हे बॉलिवूडमधील असे एक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी पडद्यावे कधीच एकसारखे पात्र निभावले नाही. कॉमेडी असो किंवा सिरिअस त्यांनी त्यांच्या पात्रात नेहमीच विविधता आणली आहे. त्यांनी प्रत्येक पात्र अशा पद्धतीने निभावले आहे की पाहणारा फक्त त्यांच्याकडे पहात राहतो. परेश रावल यांच्याबाबत एक गोष्ट अनेकांना माहीत नसेल की, त्यांचा मोठा मुलगा म्हणजेच आदित्य रावल हा देखील त्यांच्या सारखाच मल्टी टॅलेंटेड आह. तो केवळ त्याच्या टॅलेंटचा नाही तर गुड लुकच्या जोरावर देखील अनेक अभिनेत्यांना मागे सारतो.
परेश रावल यांना दोन मुले आहेत एकाचे नाव आदित्य रावल दुसऱ्याच्या नावाने अनिरुद्ध रावल हे आहे. आदित्य रावल परेश रावल यांचा मुलगा आहे त्यांनी शालिनी पांडेसोबत ‘बमफाड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही, परंतु लोकांनी त्याच्या अभिनयाला दाद दिली आणि त्याचे भरभरून कौतुक केले. हा दि त्याचा पहिला चित्रपट होता. त्यावेळी सगळ्यांना कळले की तो परेश रावल यांचा मुलगा आहे. परेश रावल हा दिसायला देखील खूप हॅन्डसम आहे त्याच्या गुडलुकच्या जोरावर तो रणवीर सिंग आणि रणवीर कपूर यांना देखील बाद देतो.
परेश रावल यांचा मुलगा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तरी देखील त्याला लाईमलाईटपासून लांब राहायला आवडते. अशातच आदित्यचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होता. या फोटोत त्याने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि डार्क राखाडी रंगाचा ब्लेजर घातला होता. त्याचा हा देखील अनेकांना खूप आवडला होता.
बॉलिवूडमधील कलाकार त्यांच्या मुलांना लॉन्स करण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसतात. परंतु परेश रावल यांनी त्याच्या मुलाबाबत असे काहीही केले नाही. एका मुलाखतीदरम्यान परेश रावल ने सांगितले होते की मी माझ्या मुलाला लॉन्च केले नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाही. परंतु मला खात्री आहे की तरीदेखील माझा मुलगा त्याच्या स्वतःच्या जीवावर आणि बळावर ती त्याचं नाव नक्की कमावेल.” अशाप्रकारे त्यांनी वक्तव्य केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-