Tuesday, June 25, 2024

सुनील दत्त यांनी मृत्यूच्या काही तासांआधी लिहिले होते परेश रावल यांना पत्र; काय होतं त्यात?

बॉलिवूडला संस्मरणीय चित्रपट देणारे दिवंगत अभिनेते सुनील दत्त (sunil dutt) यांची मंगळवारी (6 जून)ला 93 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांच्या या जयंतीनिमित्त बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या आठवणीत रमले आहेत. सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुनील दत्त यांच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये अभिनेते परेश रावल यांनी भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातही सुनील आणि परेश यांची चांगली मैत्री होती. सुनील यांनी परेश यांना लिहिलेल्या पत्रावरून त्यांची घट्ट मैत्री स्पष्ट होते.

खरं तर सुनील दत्त यांनी आपल्या निधनाच्या काही काळापूर्वी अभिनेते परेश रावल (paresh raval) यांना पत्र लिहिले होते. सन 2018मध्ये जेव्हा ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा परेश यांना स्वत: माध्यमांसोबत हा किस्सा शेअर केला होता. सोबतच आपल्या आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या मैत्रीबद्दल सांगितले होते. खरं तर सुनील दत्त यांनी परेश यांच्या वाढदिवशी लिहिलेले पत्र होते. ज्यावेळी सुनील यांनी परेश यांना हे पत्र लिहिले, त्यावेळी ते खासदार होते. ते पत्र आजही त्यांनी सांभाळून ठेवलं आहे.

एक खासदार म्हणून त्यांच्या पत्रात लिहिले होते की, “प्रिय परेश जी! जसे की, 30 मे ला आपला वाढदिवस असतो, त्यासाठी मी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्यतेसाठी प्रार्थना करतो. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आपला सर्वोत्तम आशीर्वाद कायम देवो.” इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अभिनेत्यांनी सांगितले की, जसे त्यांना सुनील यांच्या निधनाचे समजले, त्यांनी आपली पत्नी स्वरूप संपतला फोन केला आणि सांगितले की, ‘ते घरी उशिरा येतील.’

पुढे बोलताना परेश यांनी म्हटले की, “त्यावेळी माझ्या पत्नीने मला सांगितले की, सुनील दत्त यांच्याकडून तुमच्यासाठी पत्र आले आहे. ती म्हणते की, त्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगितले आहे. त्यावेळी मी म्हटले की, माझा वाढदिवस (30 मे) ला आहे. जो 5 दिवसांनंतर आहे. याला प्रत्युत्तर देत स्वरूपने म्हटले की, परंतु हे तुमच्यासाठी आहे. यानंतर त्यांनी पत्र वाचून मला सांगितले. मी खूप हैराण झालो होतो की, दत्त साहेबांनी माझ्या वाढदिवसाच्या 5 दिवस आधी पत्र का लिहिले होते? आम्ही यापूर्वी कधीच एकमेकांना कोणत्याच प्रसंगी पत्र लिहिले नव्हते.”

खरं तर सुनील दत्त यांनी आपल्या निधनाच्या काही तासांआधी हे पत्र लिहिले होते. त्यांचे आपल्या 76 व्या वाढदिवसाच्या काही दिवसांआधीच हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांनी 25 मे, 2005 रोजी मुंबईतील आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला होता.(birthday special did you know sunil dutt wrote a letter to paresh rawal hours before his death)

हे देखील वाचा