Saturday, April 20, 2024

ए भावड्या जरा इकडं बघ! भोजपुरी अभिनेत्रीच्या ‘कमर कोका कोला’ गाण्याने वेधले चाहत्यांचे लक्ष, Video Viral

बॉलिवूड आणि टॉलिवूड यांसारख्या सिनेसृष्टींमधील गाणी जेवढी प्रसिद्ध होतात, तितकीच भोजपुरी सिनेसृष्टीतील गाणीही प्रसिद्ध होतात. भोजपुरीतील प्रसिद्ध गायक आणि गायिका नेहमीच आपली ठसकेबाज आणि मसालेदार गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. असेच एक गाणे आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आले आहे. हे गाणे भोजपुरी प्रसिद्ध गायक राकेश मिश्रा घेऊन आला आहे. यामध्ये तो स्वत: देसी लूकमध्ये दिसत आहे.

राकेश मिश्रा (Rakesh Mishra) याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याचे नाव ‘कमर कोका कोला’ (Kamar Coca Cola) असे आहे. या गाण्याला राकेशच्या चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या सुंदर म्युझिक व्हिडिओत त्याची सहअभिनेत्री महिमा सिंग (Mahima Singh) आहे. महिमा तिच्या डान्स मूव्हजने प्रेक्षकांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

‘कमर कोका कोला’ हे गाणे राकेश मिश्रा आणि राधा रावत (Radha Rawat) यांनी मिळून गायले आहे. हे गाणे शुक्रवारी (दि.१७ जून) सारेगामा हम भोजपुरी या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

व्हिडिओत काय आहे खास?
या व्हिडिओच्या सुरुवातीला, अभिनेत्याचे सहकारी काकडी आणि टोमॅटोने अभिनेत्रीला आकर्षित करतात, त्यानंतर राकेश मिश्रा तिला पाहण्यासाठी येतो. यावेळी तो सहअभिनेत्रीला टोमॅटोही चारतो. या गाण्यात दिसत आहे की, टेबलरवर टोमॅटो, काकडी आणि कोका कोलाच्या बॉटलही ठेवल्या आहेत.

राकेश मिश्राचं गाणं युट्यूबवर करतंय धमाल
राकेश मिश्राचं ‘कमर कोका कोला’ हे गाणे युट्यूबवर धमाल करत आहे. काही वेळातच या गाण्याच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याने अवघ्या ८ तासातच ७० हजार व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तसेच, ८ हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे.

महिमा सिंगचा घायाळ करणारा अंदाज
या व्हिडिओत अभिनेत्री महिमा सिंग हिचा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. त्यामुळे या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत आहे. चाहत्यांना भावणाऱ्या या गाण्याचे लिरिक्स चंदन यदुवंशी यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर या गाण्याला म्युझिक छोटी रावत यांनी दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ऋचा चड्ढा ‘सेक्सिझम’ मानते अतिशय सामान्य वागणूक, म्हणाली ‘बदलाबरोबर नवीन सुरुवात होईल’

काय सांगता! सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात एक, दोन नाही, तर असणार दहा नायिका

‘के प्रोजेक्ट’च्या सेटवर दीपिका करतेय नखरे,अडचणीत आला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास

हे देखील वाचा