Wednesday, July 3, 2024

फिट राहण्यासाठी परिणीती चोप्रा जिममध्ये गाळतेय घाम; ऍब्स दाखवून सर्वांनाच केलं चकित

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या खास भूमिकांमुळे चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. केवळ प्रियांका चोप्रा हिची बहिण अशी परिणीती चोप्राची ओळख नाही. ती एक गुणी अभिनेत्री आहे, हे तिने तिच्या ‘इशकजादे’ सारख्या इतर अनेक चित्रपटांमधून सिद्ध केले आहे. परिणीती सोशल मीडियावर देखील सक्रिय असून चाहत्यांशी संवाद साधत असते. इंस्टाग्रामवर परिणीतीचे लाखो चाहते आहेत. परिणीती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करताना दिसते. ती कधी डान्सचे व्हिडिओ तर कधी वर्कआउट करताना धमाल मस्ती करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच तिने एक वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती चाहत्यांना आपले ऍब्स दाखवताना दिसत आहे. परिणीती चोप्राचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये परिणीती चाहत्यांना आपले ऍब्स दाखवत असुन, बॅकग्राऊंडला ‘अभी ना जाओ छोड के’ हे गाणे ऐकू येत आहे.

या व्हिडिओसोबत तिने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले आहे की,“जेव्हा तुम्ही तुमचा पहिले ऍब्स साजरा करणार असता, पण ट्रेनर म्हणतो अभी ना जाओ छोड कर.”तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओवर ६३ हजाराहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. एका चाहत्याने लिहीले की, “स्ट्राँग वुमन” तर दुसऱ्या चाहत्याने लिहीले की,“ब्युटीफूल.”

दरम्यान, परिणीती चोप्राने ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिने डिंपल चड्ढाची भूमिका साकारली होती. अलीकडेच तिचे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’, ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सायना’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ३२ वर्षीय परिणीती चोप्रा अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण आहे आणि ती मूळची हरियाणातील अंबालाची आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा