Wednesday, June 26, 2024

परवीन बाबीने अमिताभ यांच्यावर केला होता जीवे मारण्याचा गंभीर आरोप! पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया तो प्रसंग

परवीन बाबी बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस नाव. स्टाईलिश, बोल्ड अँड ब्युटीफुल अशी परवीन यांची छबी होती. मात्र याच परवीन बाबी सिजोफ्रेनिया नावाच्या आजाराने ग्रस्त झाल्या आणि त्यांचे जीवन बदलायला सुरुवात झाली. २० जानेवारी २००५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशातच गुरुवारी (२० जानेवारी) त्यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त आपण त्यांच्या काही खास माहिती जाणून घेणार आहोत. परवीन बाबी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांनी मारण्याचा आरोप केला होता.

परवीन (parveen babi) यांनी बॉलिवूडवर अनेक काळ राज्य केले. अभिनय आणि सौंदर्य यांचा अचूक मिलाफ म्हणजे परवीन बाबी. त्यांनी बॉलिवूडमध्ये आल्यावर स्टाईल आणि ग्लॅमर यांचे समीकरण बदलले. अशा या सौंदर्यवतीने तिच्या आयुष्यात असा काळ पाहिला जो पाहायला सर्वच लोकं घाबरतील. परवीन यांना सिजोफ्रेनिया नामक आजाराने ग्रासले, आणि त्याचे आयुष्य आणि मानसिक संतुलन बिघडायला लागले.

परवीन या १९८० साली अमिताभ बच्चन, शशी कपूर, बिंदिया गोस्वामी यांच्यासोबत ‘शान’ या सिनेमाचे टायटल ट्रॅक शूट करत होते. तेव्हा परवीन यांनी मधेच शॉट थांबवला आणि सेटवरच्या मोठ्या झुंबर खाली उभे राहायला नकार देत त्यांनी जोरजोरात ओरडत अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांना झुंबर खाली उभे करून त्यांच्यावर झुंबर पडून मारायचा आरोप लावला. या कटात त्यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पी सुद्धा सामील असल्याचे सांगितले. त्या दिवसासाठी शूटिंग थांबण्यात आले. मात्र परवीन यांच्या या आरोपांनी संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली.

एवढ्या यशस्वी आणि सुंदर परवीन या प्रेमात सपशेल अपयशी ठरल्या. परवीन यांच्या आयुष्यात तीन पुरुष आले. सर्वात आधी त्या हँडसम डॅनी यांच्यासोबत असल्याच्या बातम्या आल्या.एक चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली, आणि पुढे ते प्रेमात पडले मात्र काही दिवसातच त्यांचे डॅनीसोबत असलेले नाते संपले.

त्यानंतर त्या स्मार्ट, स्टायलिस्ट अशा कबीर बेदी यांच्या प्रेमात पडल्या. दोघेही स्वतंत्र आणि मॉडर्न विचारांचे असल्याने तिने लग्न न करता लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. येथेही त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांचे आणि कबीर बेदी यांचे काहीच दिवसात ब्रेकअप झाले.

काही दिवसांनी त्या आणि महेश भट्ट यांच्या नात्याविषयी चर्चा होऊ लागल्या. महेश आणि परवीन हे सुमारे तीन वर्ष एकत्र होते. तेव्हा परवीन यांचे मानसिक संतुलन खराब झाले होते. महेश यांनी मुलाखतीदरम्यान परवीन यांच्याबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या होत्या.

अमर अकबर एंथनी, शान, काला सोना, दीवार, काला पत्थर, द बर्निंग ट्रेन, क्रांति, नमक हलाल, कालिया, खून और पानी, सुहाग, काला पत्थर यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

हेही वाचा :

हे देखील वाचा