Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची आतुरता अखेर संपली. बुधवार (दि, 25 जानेवीरी) रोजी पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर राडा घाताल होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांचा आनंद गनात मावेनासा झाला असून सिनेमागृहाच्या बाहेर चाहत्यांनी ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या गजरात चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं. बहुचर्चित चित्रपट पठाणची कथा एका भारतीय गुप्तहेराची आहे. असून यामध्ये दीपिका पादुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या अभिनयाचे देखिल चाहते कौतुक करत आहेत.

मोस्ट अवेटेड पठाण (pathan) चित्रपट स्टारर शाहरुख खान (Shahrukh Khan) साठी प्रेक्षकांप्रती कमालीची क्रेज पाहायला मिळत आहे. पठाण वादात अडकल्यामुळे अनेक चाहत्यांनी चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती मात्र, पठाणने प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं होतं, त्यामुळे पठाणवर वादाचा काहीच प्रभाव न पडता पहिल्याच दिवशी चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे असून बॉक्सऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवले आहेत.

माध्यनातील वृत्तानुसर शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरता 100 कोटींच्या कलेक्शनजवळ पोहोचला आहे. पठाण चित्रपटाने भारतात 53.25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. फक्त हिंदी भाषेतून चित्रपटाने 51. 60 कोटींचा आकडा पार केला आहे. सांगायचे झाले तर चित्रपटाची ही कामई फक्त अर्ली ट्रेंड्स आहेत. अजून चित्रपटाचे अधिकारी आकडे समोर आले नाहीत.

पठाण हा चित्रपट एका गुप्तहेराची कथा दर्शवत असून यामध्ये थ्रिलर, कॉमेडी आणि ग्लॅमरस, डान्स या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन होत आहे. त्याशिवाय यामध्ये एक ट्वीस्ट सिन आहे, ज्यामध्ये बॉलिवूजचा भाईजान अर्थातच सलमान खान याने पाहुणा कलाकरा म्हणून पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…
चंद्रमुखी नव्या अवतारात! प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता खानविलकरची मोठी घोषणा, पोस्ट शेअर करत म्हणाली,…

हे देखील वाचा