Friday, March 29, 2024

चंद्रमुखी नव्या अवतारात! प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता खानविलकरची मोठी घोषणा, पोस्ट शेअर करत म्हणाली,…

मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतंच प्रदर्शित चंद्रमुखी चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्याशिवाय चित्रपटातील गाण्यांना देखिल चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आज (दि, 26 जानेवारी) रोजी अमृताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केली आहे. चंद्रमुखी चित्रपटाला छेद देण्यासाठी अमृता पहिल्यांदाच बायोपिकमध्ये एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतू प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

चंद्रा बनून अवघ्या महाराष्ट्राला प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) हिने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.  जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji Babar) हिच्या जीवणावर प्रेरणा घेऊन या चित्रपटाची कथा असणार आहे. चित्रपटाचं नाव देखिल ‘ललिता शिवाजी बाबर’ असंच असणार आहे. अमृता पहिल्यांदाच बायोपिकमध्ये काम करणार आहे.

भारतीय ऑलंम्पिक मधील रनरप ललिता बाबर यांनी आजपर्यंत अनेक पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगामसमोर आण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्यात येणार असुन अमृता खानविलकर ललिता बाबर यांची भूमिका साकारणार आहे. आजपर्यत त्यांनी अनेक हिंदी कार्यक्रम चित्रपट राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतर ललिता चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत.

 

View this post on Instagram

 

अनमृताने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिले की, “नव्या वर्षाचं नवं स्वप्नं …. नवं धाडस … नवी परीक्षा एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या राष्ट्राचेच नाही तर देशाचंही नाव जागतिक स्तरावर नेलं आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचलं आहेच पण ह्या वेळीस जबाबदारी मोठी आहे. तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या”, असं म्हणत तिने आगामी येणाऱ्या चित्रपटाची घेषणा केली आहे.

ललिता बाबर यांची भूमिका मिळाल्याबद्दल अमृताने तिचे मत मांडत सांगितले की, “एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेलं आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.”

 

View this post on Instagram

‘ललिता शिवाजी बाबर’ हा बायोपिक पुढच्या वर्षी म्हणजेच (दि, 26 जनेवारी 2024) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ललिता बाबर यांनी आपल्या दमदार कामगिरीने महाराष्ट्राचे नाव ऑलम्पिकमध्ये कोरले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ सिरीजचे शूटिंग संपले, स्टायलिश व्हिडिओ शेअर शिल्पाने दिली माहिती
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘नाटू नाटू’ गाण्याच्या गायकांना गव्हर्नर हस्ते सन्मान प्राप्त, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा