Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘भगव्या’ रंगाचा वाद विकोपाला! बिहार न्यायालयात ‘या’ कालारांवर नोंदवली तक्रार

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर ‘पठाण‘ चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोज नवीन काहीतर आरोप करत चित्रपटाला ट्रोल केलं जातंय ‘बेशरम रंग‘ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घतल्यामुले हिंदू धर्मीयाच्या भावना दुखवल्या आहेत असा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. आता नुकतंच चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली.

शाहरुख खान स्टारर ‘पठाण'(Pathan) चित्रपटा बेशरम रंग (Behsar Rang) या गाण्याचा वाद काही संपण्यचे नाव घेत नाही. भगव्या रंगाच्या वादामुळे देशभरात वादाचे वातावरण पसरले आहे. इंदोरमध्ये तर जाळपोळ देखिल करण्यात आली. मात्र, या होणाऱ्या वादामध्ये अजून एक मोठी बातमी समोर आली आहे की, दीपिकी पादुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन निर्माण झालेल्या वादावर बिहारमधील मुजफ्फरपुर न्यायालयात तक्रार नोंदवली असून चित्रपटा प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मुजफ्फर गावातील वकील सुधीर ओझा (Sudhir Ojha) याने शाहरुखान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आदित्य चोपडा (Adutya Chopda), जॉन अब्राहम (John Abraham) आणि सिद्धारंथ आनंद यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. ओझा यांनी तक्रारीमध्ये सांगितले की, ‘पठाण चित्रपटाचं गाणं बेशरम रंग वादग्रस्त आणि हिंदु सामाजातील लोकांच्य भावना दिखावल्या आहेत.’ नोंदविलेल्या तक्रारीवर (दि, 3 जानेवारी) रोजी सुनावनी होणार आहे.

काही दिसांपूर्वी मध्ये प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा  यांनी देखिल बेशरम रंग गाण्यावर संताप व्यक्त केला होता. त्यंनी देखिल दीपिकाने भगव्या रंगाच्या बिकीनीवर टिका करत सांगितले होते की, चित्रपटातून काढले तरच पठाण चित्रपट एमपीमध्ये प्रदर्शित केला जाईल याचा विचार करावा लागेल.” बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेशसोबत लग्नानंतर एका महिन्यातच तुटली होती जिनिलिया, ‘या’ गोष्टीमुळे होती नाराज
‘भगव्या’ रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये सनी लिओनीने लावली पाण्याला आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा