Saturday, June 29, 2024

शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर

जशी ‘पठाण’ चित्रपटाची घोषणा झाली तशी या सिनेमाची तुफान हवा होती. आता हा सिनेमा काही दिवसातच प्रदर्शित होणार असून सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात अडकला आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे एकीकडे गाजत असताना दुसरीकडे गाण्यावर मोठा वादंग उठला आहे. बऱ्याच वर्षांनी शाहरुख ‘पठाण’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आता या सिनेमाचा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर दाखवला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यबद्दल इंटरनेशनल डिस्ट्रिब्यूशनचे व्हॉइस प्रेसिडेंट नेल्सन डिसुझा यांनी सांगितले, “पठाण हा सिनेमा त्या सिनेमांमधील आहे, ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. यामुळे आमच्यासाठी आवश्यक आहे की, आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांसमोर भव्य पद्धतीने समोर आणू. आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, शाहरुख खानचा बरीच काळाने येणाऱ्या या सिनेमाचा मोठा सोहळा दुबईमध्ये देखील साजरा केला जाईल आणि ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात येईल. सध्या शाहरुख ‘पठाण’ हा सिनेमा मिडल ईस्टमध्ये प्रमोट करत असून, तो टी२० लीगमध्ये देखील पठाणचे प्रमोशन करताना दिसला.

तत्पूर्वी पठाण हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, हा सिनेमा हिंदीसोबतच तामिळ, तेलगू या प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रदर्शित होईल. २०२३ वर्षातला हा सर्वात मोठा होत सिनेमा असेल असे भाकीत वर्तवले जात आहे. तत्पूर्वी सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाले असून त्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनी तुफान वाद निर्माण झाला. सिनेमाला बॉयकॉट करण्याची देखील मागणी करण्यात आली. या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण यांच्यासोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाला घेऊन शाहरुखच्या फॅन्समध्ये खूपच उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन

‘तू लगावे जब लिपिस्टिक’ गाण्यावरील किली पॉलच्या व्हिडीओपुढे नेटकऱ्यांना पवनसिंग देखील वाटला फेल

हे देखील वाचा