मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण स्टारर शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय ठरला आहे. बेशरम रंग गाण्यचा वाद काही थांबण्याचे नावच घेत नाही. दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळे अनेक हिंदु संघटनाने वाद निर्माण केला असून सतत या चित्रपटातील कलाकारांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये नुकतंच प्रसिद्ध गायिका सुचित्रा कृष्णमूर्ती हिने देखिल आपले मत व्यक्त केले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamurthy) हिने नुकतंच सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं असून बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामधील भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन निर्माण झालेल्या वादावर मत व्यक्त केले आहे. तिने ट्वीट शेअर करत लिहिले की, “रंग कधी बेशरम नसतात, लोकांचे विचार बेशरम असतात.”
Hello World ❤ pic.twitter.com/I1t9wc8rDY
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) December 10, 2022
बेशरम रंग हे गाणं (दि, 12 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अनेक राजकारणी नेत्यांनी गाण्याला बॅन करण्यची मागणी केली आहे. मात्र, अभिनय क्षेत्रामधील अनेक कलाकारांनी या गाण्याला सर्थन केलेले दिसून येत आहे. नुकतंच कन्नड अभिनेत्री आणि पूर्व सांसद राम्या कृष्णन (Ramya Krishnan) हिने देखिल दीपिका पादुकोण पाठिंबा दिला होता. त्याशिवाय ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याची गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) हिने देखिल चित्रपट 2 वेळेस पाहाण्याचा निर्णय घेतला आहे.
Rang kabhi besharam nahin ho sakte. Besharam hote hai logon ke iraade.
????????????— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) December 18, 2022
सांगायचे झाले तर पठाण चित्रपट (दि, 25 जानेवरी) रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहाण्यासठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे. दीपिका आणि शाहरुखशिवाय या पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहम (John Abraham) देखिल पाहायला मिळणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उचलली जीभ लावली टाळ्याला! कंगना म्हणतेय, ‘मला थेट संसदेत करायचंय…’
दीपिकाचा प्रसिद्ध अभिनेत्यावर होता क्रश; झोपण्यापूर्वी करायची ‘हे’ काम