Tuesday, May 21, 2024

दीपिकाचा प्रसिद्ध अभिनेत्यावर होता क्रश; झोपण्यापूर्वी करायची ‘हे’ काम

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याला ‘पठाण‘ या सिनेमातील तिचे एक गाणे आणि त्यातील तिचे कपडे कारणीभूत ठरले. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीत शाहरुख खान याच्यासोबत रोमान्स केला. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उडाली. असे असले, तरी या गोष्टींकडे दीपिकाने दुर्लक्ष केले. ती सातत्याने सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. दीपिका ही कोट्यवधी चाहत्यांची क्रश आहे. मात्र, दीपिकाचाही एक अभिनेता क्रश होता. याबद्दल तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता.

कोण होता दीपिका पदुकोणचा क्रश?
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या बालपणीच्या क्रशबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, लहानपणी तिला एक अभिनेता इतका आवडायचा की, त्याला किस केल्याशिवाय ती झोपतही नसायची.

दीपिकाने एका नामांकित मॅगझिनशी बोलताना तिने याबाबत खुलासा केला होता. दीपिकाने सांगितले होते की, ती आणि तिची बहीण अनीशा हे एकाच खोलीत राहायचे. त्यांच्या खोलीत ‘टायटॅनिक’ (Titanic) फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ (Leonardo DiCaprio) याचे भरमसाठ पोस्टर्स लावलेले असायचे. दीपिका म्हणाली होती की, ती झोपण्यापूर्वी त्याच्या फोटोंवर किस करायची. या खुलाशानंतर चाहतेही हैराण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

वादाच्या भोवऱ्यात दीपिकाचा सिनेमा
सन 2022मध्ये ‘गेहराईयां’ सिनेमात झळकणारी दीपिका पुढील वर्षी म्हणजेच 25 जानेवारीला ‘पठाण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे भलताच वादंग निर्माण झाला आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती, ज्यामुळे विविध क्षेत्रांतून तिच्यावर सडेतोड टीका झाली आणि होतेय. अशात या सर्वांचा सिनेमावर काही परिणाम होतो की नाही हे आगामी काळात समजेल. (actress deepika padukone childhood crush she used to kiss this actor photo before sleeping)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीने भगवी बिकिनी घालून समुद्रात लावले ठुमके; नेटकरी म्हणाले, ‘लाज वाटू दे जरा’
भाजप खासदार अन् अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, स्वागताचा झक्कास व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा