सुशांतची आठवण काढण्यावर अंकिताने दिले ‘असे’ उत्तर; भडकलेल्या नेटकऱ्यांनी केले ट्रोल


अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला मागच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. १४ जून, २०२० रोजी सुशांत त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आज एक वर्ष उलटूनही त्याचे फॅन्स आणि काही कलाकार त्याच्यासाठी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. असो, सुशांत आणि अंकिता लोखंडे यांचे नाते तर सर्वश्रुत आहे. अंकिताकडे सुशांतच्या फॅन्सचे नेहमी लक्ष असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट कधीही नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही. अंकिता देखील अनेकदा सुशांतची आठवण काढताना दिसली आहे. बऱ्याचदा ती तिच्या सुशांतसोबतच्या आठवणी पोस्ट करताना दिसते. जरी अंकिता आणि सुशांत यांचे नाते काही वर्षानंतर संपुष्टात आले असले, तरीही फॅन्सला अजूनही हीच जोडी सर्वात जास्त आवडते. आज अंकिता तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. मात्र, तरीही ती सुशांतबद्दल भरभरून बोलते.

अंकिताला सुशांत संदर्भातल्या सोशल मीडियावरील पोस्टवरून बऱ्याचदा ट्रोल करण्यात आले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकली की, त्यात काहीतरी चूक काढून तिला ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा अंकिता सुशांतवरून ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर कधी काय होईल, याचा कधीच नेम नसतो. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘पवित्र रिश्ता २.०’ येणार आहे. यात अंकिता पुन्हा अर्चनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण सुशांत यात मानवची भूमिका साकारताना दिसणार नाही.

नुकतीच अंकिता एका ठिकाणी स्पॉट केली गेली. भारतीय पेहरावात असलेल्या अंकिताला फोटोग्राफर्सने घेरले आणि तिला त्यांनी काही प्रश्न देखील विचारले. यावेळी अंकिता देखील प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देताना दिसली. यावेळी एका फोटोग्राफरने तिला विचारले की, “तुम्ही जिमला जातात का?” यावर तिने तिचे हात वर उचलले. एकाने तिला पवित्र रिश्ता २.० साठी शुभेच्छा देताना विचारले की, “लवकरच पवित्र रिश्ता २.० येणार आहे, तर यासाठी तुम्ही किती खुश आहात?” त्यावर ती म्हणाली की, “मी खूप खुश आहे.” यावेळी तिला फोटोग्राफर्सने सांगितले की, पवित्र रिश्ता २.० मध्ये सुशांत सिंग राजपूतची खूप आठवण काढू. यावर ती म्हणाली, “छोटू अब बड़े हो जाओ.” तसेच हसत हसत ती तिच्या गाडीत बसली.

तिचे ‘छोटू अब बड़े हो जाओ’ हे उत्तर ऐकून सोशल मीडियावर युजर्स खूप संतापले आहे. तिच्या या उत्तरावरून तिला खूप ऐकवले जात आहे. यावेळी एका युजरने तिला सांगितले, “अंकिता तू हो म्हणू शकली असती.” दुसऱ्याने तिला सांगितले की, “सुशांतची आठवण काढण्यासाठी लहान मोठे काय?” एकाने तर म्हटले आहे की, “सुशांतच्या पैशावर मजा मारलेली लोभी स्त्री.” काहींनी तर पवित्र रिश्ता २.० ला बॉयकॉट करायची मागणी केली आहे.

सुशांतला श्रद्धांजली वाहताना निर्माती एकता कपूरने ‘पवित्र रिश्ता २.०’ ची घोषणा केली होती. अंकिता पुन्हा या शोमध्ये दिसणार आहे. पवित्र रिश्ता मालिकेमुळेच अंकिता आणि सुशांत यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. आता सध्या अंकिता विकी जैनसोबत नात्यात आहे. ती नेहमी विक्कीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


Leave A Reply

Your email address will not be published.