सोनी टीव्हीच्या सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चा विजेता पवनदीप राजन आणि फर्स्ट रनर अप अरुणिता कांजीलाल कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, अरुणिता आणि पवनदीप यांनी ऑक्टोपस एंटरटेनमेंट कंपनीसोबत म्युझिक अल्बम शूट करण्यास आणि प्रमोशन करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, पवनदीप (Pawandeep Rajan) आणि अरुणिता (Arunita Kanjilal) यांना मिळालेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) शी ऑक्टोपस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने संपर्क साधला होता. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पवनदीप आणि अरुणिता यांना सेवा देण्यासाठी एक करार केला होता.
बांधिलकी असूनही असहकाराचा आरोप
ऑक्टोपस कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या लोकांनी इंडियन आयडल १२ च्या विजेत्याला २० रोमँटिक गाण्यांसाठी साइन केले. ऑक्टोपस एंटरटेनमेंटने पवनदीप आणि अरुणिता यांच्या संदर्भात सोनी पिक्चर्ससोबत केलेल्या करारानुसार, सोनीने दोन्ही कलाकारांच्या सेवा देण्याचे मान्य केले आहे. इंडियन आयडलचा विजेता होण्यापूर्वी ही वचनबद्धता दिली होती. कंपनीच्या लोकांनी बराच पैसा खर्च करून पत्रकार परिषदेत अल्बम लाँच केल्याची घोषणा केली होती. मात्र गाणे शूट केल्यानंतर कलाकारांनी निर्मात्याला सहकार्य केले नाही.
माध्यमांतील वृत्तानुसार, प्रथम अरुणिता आणि नंतर पवनदीप यांनी सोनीच्या वचनबद्धतेनंतरही निर्मात्याला शूटिंगमध्ये सहकार्य करणे थांबवले आणि नंतर गाण्याच्या प्रदर्शन आणि प्रमोशनमध्ये सहकार्य केले नाही. सोनीला कळवल्यावरही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट कलाकारांना पाठिंबा दिला. त्याचवेळी IMPPA ने सोनीला जाब विचारला असता त्यांनी सोनीची ही विशिष्ट कंपनी IMPPA ची सदस्य नसल्याचे सांगत तसे करण्यास नकार दिला.
ते म्हणाले की, त्यांची सोनी कंपनी केवळ चित्रपट, वेबसिरीज तसेच मालिकांसाठी निर्माते सदस्यांसोबत काम करते. सोनीचे उत्तर मिळाल्यानंतर, IMPPA ने त्यांना निर्माते आणि कलाकारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. त्यांनी दिलेल्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे.
अरुणिता आणि पवनदीप यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. इंडियन आयडलमध्ये दोघांचा लव्ह अँगल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जरी दोघांमध्ये लव्ह ट्रॅक नव्हता. ते चांगले मित्र होते. दोघांची केमिस्ट्री लोकांना एवढी आवडली की, ते एकमेकांना जोडू लागले. शो संपल्यानंतर अरुणिता आणि पवनदीप यांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही एकत्र कार्यक्रम करतात.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
- ऋता दुर्गुळे ठरली मिलियनमध्ये फॅन क्लब असणारी पहिली मराठी अभिनेत्री, वाचा संपूर्ण माहिती
- Mika Di Vohti | मिका सिंगच्या स्वयंवरची झालीय तयारी, ‘या’ दिवसापर्यंत करू शकता रेजिस्ट्रेशन
- आदित्य नारायणने पहिल्यांदा दाखवली मुलीची झलक, वडिलांच्या खांद्यावर झोपलेली दिसली त्विषा