Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

मीटू कॅंपेनदरम्यान अभिनेत्री पायल घोषचे नाव समोर आले होते. ‘पटेल की पंजाबी शादी‘ चित्रपटातील अभिनेत्री पायल घोषने साजिद खान आणि अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले हाेते. अशात आता पायलच्या जीवाला धोका आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीने दिली आहे. पायलने तिच्या इंस्टाग्रामवर सुसाईड नोटही शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कोलकाता येथील रहिवासी असलेल्या पायल घोष (payal ghosh) हिने अनुराग कश्यपवर 2020 मध्ये विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. याबाबत तिने अनेकदा निवेदनेही दिली आहेत. यापूर्वी मीटू कॅंपेनदरम्यान पायलने साजिद खानवर शाेषण केल्याचाही आरोप केला होता. अशात आता पायल घोषने तिच्या इन्स्टाग्रामवर एकामागून एक अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये तिने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. ही पाेस्ट समाेर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलीस पोहोचले पायल घोषच्या घरी
पायल घोषने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये लिहिले की, ‘ओशिवारा पोलिस माझ्या घरी आले होते. मला काही झाले, तर मी सर्वांना घेऊन बुडेल. मी जर मेली तर सगळ्यांना घेऊन बुडेल. मी आयुष्यात कोणत्या टप्प्यातून जात आहे, याबद्दल साइकेट्रिस्टशी बोला.” याशिवाय पायल घोष तिच्या इन्स्टाग्रामवर गेल्या दिवसापासून सतत पोस्ट करत आहे. शनिवारी पायलने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘मी पायल घोष आहे, जर मी आत्महत्या केली किंवा मला हृदयविकाराचा झटका आला, तर त्याला ते लोक जबाबदार असतील.’

पायल घोषने 2020 मध्ये अनुराग कश्यप विरुद्ध शोषणाचा गुन्हा दाखल करून प्रसिद्धीझोतात आली होती. पायल घोषने 22 सप्टेंबर 2020 रोजी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पायल घोषने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, ‘कश्यपने 2013 मध्ये वर्सोवा येथील यारी रोडवरील एका ठिकाणी तिचा विनयभंग केला होता.’ गुन्हा नोंदवल्यानंतर पायलने सोशल मीडियावर याबाबत अनेकदा उघडपणे बोलली.(payal ghosh shared suicide note instagram and warn if she die by heart attack people will be responsible)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा