Saturday, June 15, 2024

‘बिग बाॅस 16’च्या ‘या’ स्पर्धकाला साजिद खानने ऑफर केले गाणं, एकेकाळी हाेता 36चा आकडा

बिग बॉस सिझन 16‘ हा शो नुकताच सामाप्त झाला आहे. परंतु या शो मधील सर्व स्पर्धक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कारण, काहींना चित्रपट तर काहींना मालिकेत कामे मिळाली आहे. दरम्यान, आता साजिद खान या स्पर्धकावर मेहरबान दिसत आहे. बिग बॉसनंतर आता साजिद खान त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, बिग बॉसची स्पर्धक सौंदर्या शर्माला खास ऑफर दिली आहे.

अलीकडेच बातमी आली होती की, साजिदने सौंदर्याला त्याच्या चित्रपटात गाणं करण्याची संधी दिली. 4 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करणारा साजिद लवकरच त्याचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे, ज्यामध्ये शहनाज गिल मुख्य भूमिकेत आहे. शोमध्येच सौंदर्या (soundarya sharma)आणि गौतमचे ब्रेकअप झाले होते, ज्यादरम्यान साैंदर्याचे साजिद खानसोबत चांगले बाॅंडिंग झाले.

साजिद आणि सौंदर्याच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, ते फक्त दोघांनाच माहित, पण अलीकडेच अब्दु रोजिकच्या पार्टीत सौंदर्या मंडलीशी खूप मैत्रीपूर्ण वागताना दिसली. साजिद खानच्या इश्कच्या चर्चा जॅकलिन फर्नांडिससोबतही झाल्या आहेत. साजिदचे गौहर खानसोबतही प्रेमसंबंध होते.

बिग बॉस 16 (bigg boss 16) मध्ये गेल्यानंतर साजिद (sajid khan) खानच्या विरोधात मीटूची प्रक्रिया सुरू झाली. जवळपास रोजच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री पुढे येऊन दिग्दर्शकावर शोषणाचा आरोप करत असत. शर्लिन चोप्राने पोलिसात जाऊन मी टू अंतर्गत तक्रारही दाखल केली होती. याशिवाय अनेक तक्रारीही आल्या होत्या, ज्यामध्ये अभिनेत्रींनी दिग्दर्शकाने त्यांचे शोषण केल्याचे सांगितले होते.

साजिद आणि सौंदर्याच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक अभिनेत्री सौंदर्या हिला गोल्ड डिगर म्हणत ट्रोल करत आहेत. हे जरी खरे असले तरी सौंदर्या साजिदला सर्व काही माहीत असताना डेट कशी करू शकते. असा प्रश्न साेशल मीडिया युजर्सला पडत आहे.(bollywood director sajid khan dating bigg boss 16 contestant soundarya sharma sajid khan offer soundarya sharma item song in his film)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साेनू सूद लाेकांना मदत करण्यासाठी इतके पैसे आणताे तरी कुठून? अखेर अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला…

निमृत कौरशी प्रेम की मैत्री? शिव ठाकरेंनी उघडलं गुपित; म्हणाला, ‘आमचे बंधन तर आहे…’

हे देखील वाचा