कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं


कार्तिक आर्यन हा बॉलीवूडमधला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर, उत्तम अभिनयामुळे आणि गुड लुक्समुळे लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले. अभिनेता कार्तिक आर्यन चाहत्यांचा लाडका आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसोबतच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. परंतु, मागच्या काही काळापासून कार्तिक आर्यन सतत त्याच्या चित्रपटांमुळे आणि चित्रपटातून बाहेर निघाल्यामुळे चर्चेत होता. करण जोहर आणि कार्तिक यांच्यामधील वादामुळे ‘दोस्ताना २’ मधून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ‘दोस्ताना २’ नंतर आणखी एक चित्रपट कार्तिकच्या हातून निसटला. या चित्रपटाचे नाव होते ‘फँटम.’ हा सिनेमा एक सायन्स फिक्शन असलेला चित्रपट होता. हे दोन मोठ्या बँनरचे सिनेमे हातातून गेलेल्या कार्तिकबद्दल सर्वानाच चिंता होती. मात्र आता कार्तिकसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

नुकतीच कार्तिक आर्यनने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. त्याच्या नवीन सिनेमाचे नाव आहे, ‘कॅप्टन इंडिया’. हा सिनेमा हंसल मेहता दिग्दर्शित करणार आहेत. सिनेमाची कथा एका युद्धग्रस्त देशासाठी भारताने केलेल्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी बचाव मिशनची आहे. (Kartik aaryan announce new film captain india)

कार्तिकने त्याच्यासोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमाचा पहिला लुक शेअर करताना कार्तिकने लिहिले, “जेव्हा एक व्यक्ती त्याच्या ड्युटीच्याही पलीकडे जातो. अतिशय अभिमानाने आणि सन्मानाने आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, कॅप्टन इंडिया.” कार्तिकच्या या पोस्टवर कलाकार आणि फॅन्सने त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

कार्तिक या चित्रपटाबद्दल म्हणाला, “कॅप्टन इंडिया हा सिनेमा एक प्रेरणादायी आणि रोमांचित करणारा चित्रपट असणार आहे. या सिनेमासोबत मला आपल्या देशाच्या एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचा भाग बनण्याची संधी लाभली असल्याने मी स्वतःला खूप भाग्यशाली समजत आहे. हंसल सरांच्या कामाबद्दल माझा मनात नेहमीच एक सन्मान आहे. आम्ही मिळून एक चांगली कलाकृती सर्वांसमोर आणू.”

हंसल मेहता यांनी सांगितले, “कॅप्टन इंडिया खऱ्या घटनेवरून प्रेरित सिनेमा असणार आहे. या चित्रपटात एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहायला मिळणार आहे, ज्याने त्याच्या त्रासाला आणि दुःखाला बाजूला ठेऊन हजारो लोकांचे जीव वाचवले.”

या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा करणार असून, बावेजा स्टूडियोजचे विक्की बाहरी सहनिर्माते असणार आहे. या सिनेमासोबतच कार्तिक ‘धमाका’, ‘भूल भुलैया २’ सिनेमातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते…’, म्हणत ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले दु;ख

-तुरुंगात राहूनही मोडला नाही राज कुंद्राचा माज; चौकशीमध्ये सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी…

‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त

 


Leave A Reply

Your email address will not be published.