Tuesday, July 9, 2024

कंगनाच्या शोमध्ये पायल आणि करणवीरमध्ये तुफान राडा, भांडणादरम्यान जोरजोरात रडली पायल

कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या तुफान चर्चेत आहे. एकतर कंगनाचे ओटीटीवर पदार्पण असल्यामुळे या शोची एक वेगळीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे, आणि त्यात शोमध्ये सहभागी झालेले एकापेक्षा एक भारी भारी स्पर्धक असल्यामुळे हा शोने मोठा बज तयार केला आहे. शोमध्ये कंगनाकडून स्पर्धकांना विविध टास्क पूर्ण करावे लागत आहे. या दरम्यान सामील झालेल्या स्पर्धकांमध्ये प्रेम देखील दिसत आहे, आणि दुश्मनी देखील दिसत आहे. या शोमध्ये कलाकार देखील त्यांच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टी जगासमोर आणताना दिसत आहे.

आता ऑल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक या शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा आणि अभिनेत्री पायल रोहतगी यांच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. त्यांच्यातले भांडण वाढत वाढत एवढे वाढले की, त्यांनी एकमेकांवर विविध आरोप प्रत्यारोप करणे देखील सुरु केले. त्याच भांडणांमध्ये पायलने करणवीरला महिलाविरोधी म्हटले आणि यावर उत्तर देताना करणवीरने पायलला असे काही म्हटले की जे ऐकून पायल रडायलाच लागली.

या प्रोमोमध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. त्यातच पायल रागाने करणला म्हणते, “तू एक स्त्रीविरोधी व्यक्ती आहेस.’ पायलचे बोलणे ऐकून करण म्हणतो, “ही मुलगी जी तुमच्यासमोर उभी आहे, तिला एक जोरूचा गुलाम पाहिजे.” करणचे हे बोलणे ऐकून पायल जोरजोरात रडायला लागते आणि ती त्याला म्हणते, “तू माझ्या जोडीदाराला या सर्वांमध्ये नको आणू, मी तुझ्या पत्नीचे नाव देखील घेतले नाही. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या जोडीदाराचे इथे नाव घेण्याची, माझ्या वैयक्तिक आयुष्यात जाण्याची तुझी हिंमत कशी झाली.”

या शोमध्ये करणने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता की तो मोठ्या स्वरूपात कर्जात बुडालेला असून, त्याच्यावर ३/४ केसेस देखील चालू आहे. त्याने सांगितले की, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात आहे. कारण मी घेतलेले कर्ज चुकवू शकलो नाही. २०१५ सालापासून मी जे काम करत आहे, ते फक्त कर्जातून बाहेर येण्यासाठी. मला स्वतःसाठी आणि माझ्या परिवारासाठी खूपच वाईट वाटते. माझ्या जागी कोणी असते तर त्याने आत्महत्या केली असती.” करणच्या या मोठ्या खुलाशानंतर तो मीडियामध्ये खूपच गाजला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा