Wednesday, July 3, 2024

‘अमृता फडणवीस’ यांच्यावर नेटकरी बरसले व्हिडिओ शेअर करताच म्हणाले, ‘का त्रास…’,

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे तर काही वेळा त्याच्या गाण्यामुळे त्याचं कौतुकही होत तर कधी त्यांना ट्रोलही केलं जात. अमृता फडणवीसांना गाण्याची आवड फारच आहे. तसेच त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. महाशिवरात्री निमित्त अमृता फडणवीसांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत व्हिडिओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच ‘मूड बना लिया’ (mood bana liya) गाणं प्रदर्शित झालं. त्यांच्या या गाण्याला युट्यूबवर (you tube) 50 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. अमृता फडणवीस यांचं शिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित केलं.

यावेळी अमृता फडणवीसांनी चाहत्यांना शुभेच्छा देतांना त्याचं ‘शिव तांडव स्रोतम’ हे गाणं पुन्हा शेअर केलं आहे. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा हा व्हिडीओ आणि लिंक शेअर केली आहे. त्याचबरोबर, ” ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा..” असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीसांचं गेल्या वर्षी 24 फेब्रुवारी ‘शिव तांडव स्रोतम’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात अमृता या साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हटले आहे. या गाण्याला 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून नेटकरी पुन्हा एकदा अमृता फडणवीसांना ट्रोल केले आहे.

अमृता फडणवीसांनी आतापर्यंत ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया’ अशी लोकप्रिय गाणी गायली आहेत. (people-angry-on-amruta-fadnavis-viral-video-mahashivratri-special)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ होते ‘अवधूत गुप्ते’ यांचे पहिले प्रेम जाणन घ्या, त्यांचा संगीतमय प्रवास
‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणारा ‘वेड’ ठरला दुसरा मराठी चित्रपट

हे देखील वाचा