Friday, June 14, 2024

‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणारा ‘वेड’ ठरला दुसरा मराठी चित्रपट

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं आहे. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, बाहेरील राज्यात देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रितेश व जिनिलीया यांनी या चित्रपटात श्रावणी आणि सत्याची भुमिका केली आहे. त्यांच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाने शाहरुखच्या पठाण या चित्रपटाला टक्कर दिली आहे. तर बघुया या चित्रपटाने किती कमाई केली?

‘वेड’ (Ved movie) नंतर शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ सह (Pathaan) इतर चित्रपटही प्रदर्शित झाले. पण याचा रितेश-जिनिलीयाच्या (Riteish & Genelia deshmukh) चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नाही. आता चित्रपट प्रदर्शित होऊन 50 दिवस उलटले आहेत. तरीही चित्रपटगृहांमध्ये ‘वेड’ पाहण्यासाठी प्रेक्षक जात आहेत. यादरम्यानचाच एक व्हिडीओ रितेश-जिनिलीयाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकां जेवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्याचबरोबरीने रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक विसरले नाहीत. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला. 50 दिवसांनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कितपत कमाई केली हे आता समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

प्रदर्शनाच्या 50 दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरात 74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठीमध्ये सर्वाधिक चालणाऱ्या चित्रपटांमध्ये आता ‘वेड’चाही समावेश झाला आहे. मध्यंतरी व्हॅलेंटाईन डेनिमित्त रितेशने प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली होती.

‘वेड’ कोणत्याही चित्रपटगृहामध्ये फक्त ९९ रुपयांमध्ये दाखवण्यात आला. 14 ते 16 फेब्रुवारी ही ऑफर होती. याचाच या चित्रपटाला सर्वाधिक फायदा झाला. आता ‘वेड’च्या यशानंतर हे मराठमोळं कपल आणखी कोणता नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? हे पाहावं लागेल. (riteish and genelia deshmukh ved movie box office collection record break movie)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ होते ‘अवधूत गुप्ते’ यांचे पहिले प्रेम जाणन घ्या, त्यांचा संगीतमय प्रवास
आधीच अफेअरच्या चर्चा, त्यात सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अनन्याने’ माजवली खळबळ; एकदा वाचाच

 

हे देखील वाचा