Monday, July 1, 2024

तबस्सुम थाटात जगत होत्या आयुष्य, एवढ्या कोटींची संपत्ती ठेवली राखूण

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी (दि, 19 नोव्हेंबर) रोजी 78 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीचे हृदय विकाराच्या झटक्याने अचानकच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये कामाची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकामध्ये काम केले होते. दुर्दर्शनवरील प्रसारित ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमासाठी अभिनेत्रीला जास्त ओळखले जायचे. काही चाहते त्यांना ‘बेबी’ तबस्सुम या नावाने देखिल ओळखल्या जायच्या.

दिग्गज अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचा जन्म 1944 साली मुंबई अयोध्यामध्ये झाला होता. त्यांचे आई-वडील खूप मणमोकळ्या विचाराचे होते. अभिनेत्रीच्या नावामागे देखिल रंजक किस्सा आहे. तबस्सुम यांच्या आईचा धार्मिक रित्या विचार करत त्यांच्या वडीलांनी अभिनेत्रीला तबस्सुम असे नाव दिले. तबस्सुम यांच्या लग्नापूर्वी त्यांचे नाव किरण बाला सचदेव होते.

अभिनेत्री मालिका आणि चित्रपटामध्ये काम करत असूनही त्या स्वत:चे युट्युब चॅनेल देखिल चालवत होत्या. तबस्सुम टॉकिज या नावाने आपले युट्युब चॅनेलवत होत्या सतत प्रेक्षकांना चित्रपटांचे किस्से सांगत होत्या, त्याशिवाय तबुस्सुम सोशल मीडियावरही खूप सक्रिय होत्या. त्या सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत असे. त्यांनी शेवटची पोस्ट देखिल ‘यादो की बारात’ (1973) या चित्रपटाची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती.

 

View this post on Instagram

 

माध्यमातील वृत्तानुसार तबस्सुम यांची इंडस्ट्रीतील धनवाल लोकांमध्ये मोजनी केली जाते. त्या आपले आयुष्या शाही पद्धतीने जगत होत्या. माहितीनुसार त्या 12 कोटी पेक्षा जास्त धनाच्या मालकीण होत्या. त्यांच्या अशा अचानकर निधनाने त्यांचे चाहते खूप दु:खी आहेत. माहीतीनुसार (दि, 21नोव्हेंबर) रोजी त्यांची शोक सभा ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा-
सौंदर्यामुळेच जुंपले विश्वसुंदरींमध्ये भांडण, अभिनेत्री ऐश्वर्या राय-सुष्मिता सेनमधील गाजलेला किस्सा
अरे बापरे! चक्क झीनत अमानवर उचलला होता ‘या’अभिनेत्याने हात, वाचा संपूर्ण किस्सा…

हे देखील वाचा