Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड कंगनाने सुनावली दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाची कारणे, तर बॉलिवूडला दिला ‘हा’ सल्ला

कंगनाने सुनावली दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशाची कारणे, तर बॉलिवूडला दिला ‘हा’ सल्ला

कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिला ट्विटरवर बॅन केल्यापासून, ती इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. ती आपल्या पोस्टद्वारे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असते. याच्यामुळे ती बऱ्याचदा संकटात सापडते. सध्या तिने सोशल मीडियाच्या मदतीने साऊथ चित्रपटसृष्टी आणि कलाकारांवरून मोठी गोष्ट समोर आणली आहे. तिने साऊथ चित्रपटांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

साऊथ चित्रपटसृष्टीच्या यशाची कारणे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये कंगनाने साऊथ चित्रपटांच्या यशाची कारणे सांगितली आहेत. पहिलं कारण सांगताना ती म्हणाली की, “ते आपल्या संस्कृतीच्याशी नाळीशी जोडलेले आहेत. ते आपल्या परिवार आणि नात्यांना घेऊन पारंपारिक आहेत, पाश्चिमात्य नाहीत. त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

बॉलिवूडला कंगनाचा सल्ला
सोबतच तिने आपले मत व्यक्त करताना लिहिले की, “त्यांना स्वतःला बॉलिवूडमध्ये येऊन आपलं अस्तित्व नाहीसं करण्याची काही गरज नाही आणि तशी परवानगी सुद्धा कोणाला द्यायला नको.”

कंगना रणौत मूळची हिमाचल प्रदेशमधील आहे. २००६ मध्ये आलेल्या ‘गॅंगस्टर’ सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर २००८मध्ये आलेला ‘फॅशन’ सिनेमाने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली. या सिनेमासाठी तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि त्याचबरोबर फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा